Wednesday, November 4, 2026

महाराष्ट्रात षंढगिरीची सुरुवात करणाऱ्या संजय राऊतांनी गोकुळ प्रकरणावर बोलू नये, नवनाथ बन यांचा घणाघात

Navnath Ban: देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जनतेने बहुमत दिले असताना फक्त आणि फक्त मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेसच्या दावणीला आपला पक्ष बांधला. याला षंढगिरी म्हणतात आणि या षंढगिरीची सुरुवात महाराष्ट्रात तुम्ही आणि तुमच्या मालकांनी केली, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केला.

Navnath Ban: भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत, बुधवारी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. पत्रकार परिषदेत बोलताना, आज गोकुळमध्ये जे घडतेय त्याकडे बोट दाखवताना त्या परंपरेची सुरुवात आपण केली होती, हे जनाब संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे. 2019 मध्ये महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी तुम्ही भाजपासोबत युती केली होती. भाजपाच्या नावावर मते मागितली. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जनतेने बहुमत दिले असताना फक्त आणि फक्त मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेसच्या दावणीला आपला पक्ष बांधला. याला षंढगिरी म्हणतात आणि या षंढगिरीची सुरुवात महाराष्ट्रात तुम्ही आणि तुमच्या मालकांनी केली, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केला.

पुढे बोलताना, मिर्झा, खान, औरंगजेब यांचे समर्थन केल्याशिवाय संजय राऊत यांना पर्याय नाही. तसेच, त्यांना हिरवी मते हवी आहेत. खानाच्या पिल्लावळीचा उदोउदो करण्याचे काम संजय राऊत आणि औरंगजेबाचा उदोउदो करण्याचे काम उद्धवजी ठाकरेंकडून केले जातेय. तुम्हाला फक्त हिंदूंचे सण आल्यानंतरच प्रदूषण आठवते का? होळी आल्यावर इको-फ्रेंडली होळी, दिवाळी आल्यानंतर इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करता. बकरी ईदच्यावेळी संजय राऊत यांची दातखिळी बसते का? फक्त हिंदूंकडे बोटे दाखवायची, हिंदूंच्या परंपरांचा, सणांचा अपमान करायचा, एवढाच अजेंडा उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि मिर्झासारख्या लोकांचा असतो, अश्या जहारीला शब्दात बने यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला. तसेच पुढे बोलतांना, एक लक्षात घ्या, देशातला हिंदू नागरिक जागा झालेला आहे. तो तुमच्यासारख्यांचा नाटकीपणा ओळखतोय. तुम्ही यावेळी बकरी ईदला इको-फ्रेंडली बकरी साजरी करा, पिठाची बकरी कापा, असे आवाहन करणारा व्हिडिओ करा आणि मग हिंदूंच्या सणांना आक्षेप घ्या.

रस्त्यावर तांडव करण्याची वेळ संजय राऊत, तुमच्या पक्षावर आली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला नाकारत रस्त्यावर आणले. तुम्हाला सत्ता चालवता येत नाही, तुम्हाला आम्ही सत्तेवर बसवत नाही, तर तुम्हाला रस्त्यावर आणतोय, सांगितले. आपला अख्खा उबाठा गट रस्त्यावर आलाय. देवाभाऊंनी शेतकऱ्यांना मदत केली. महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर एकाही सरकारने शेतकऱ्यांना 5 हजार रुपये आगाऊ मदत दिली नव्हती. दोन दिवसांपासून जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये भरले जात आहेत. याआधी काँग्रेस, राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंनी एव्हढी मदत केली नव्हती. ही अंतिम मदत नाही. यानंतर पंचनामे झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना तेवढी मदत केली जाईल. महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही बांधावर जाऊन 50 हजार रुपये देऊ, 25 हजार रुपये देऊ, अशा थापा मारल्या आणि एक दमडी, फुटकी कवडीही दिली नव्हती, अशी आठवण यावेळी नवनाथ बन यांनी करून दिली.

नवनाथ बन पुढे म्हणाले, या महाराष्ट्रात चार संजय राऊत आहेत. एक संजय राऊत उद्धव ठाकरेंची गुलामी करतात, दुसरे संजय राऊत राहुल गांधींची चाकरी करतात आणि तिसरे संजय राऊत शरद पवारांचे लांगूलचालन करतात. आता त्यात चौथ्या संजय राऊतांची भर पडली. चौथे संजय राऊत म्हणजे चीनचे एजंट आहेत. चीनची एजंटगिरी करणाऱ्या संजय राऊत यांनी इतरांवर टीका करण्याआधी आपले चार वेगवेगळे चेहरे कसे आहेत, हे महाराष्ट्राला सांगावे आणि मगच एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करावी.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >