Dhule : धुळे हादरले ! रेल्वे रुळाशेजारी रक्ताच्या थारोळ्यात आढळला 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह, मोबाईलवरील एका कॉलने उलगडले गूढ

Dhule : अहमदाबादहून पश्चिम बंगालमधील मालदा येथे आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या २८ वर्षीय तरुणाचा धुळे जिल्ह्यात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नरडाणा-शिंदखेडा रेल्वेमार्गावरील होळ गावाच्या शिवारात हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे, त्याच्या खिशातील मोबाईलवर आलेल्या फोनमुळे त्याची ओळख पटली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.



रेल्वे रुळाशेजारी रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुण


मिळालेल्या माहितीनुसार, रमजान शेख रोजान शेख (वय २८) हा गुजरातमधील अहमदाबाद येथून पश्चिम बंगालमधील मालदा येथे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होता. दोन दिवसांपूर्वी तो आपल्या गावी जाण्यासाठी रवाना झाला होता. मात्र, गाव गाठण्यापूर्वीच त्याच्यासोबत दुर्दैवी घटना घडली. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता होळ (ता. शिंदखेडा) गावाच्या शिवारात नरडाणाकडून शिंदखेड्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या उजव्या बाजूला एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला ग्रामस्थांना दिसून आला. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.



खिशातील मोबाईलवर आलेल्या फोनमुळे पटली ओळख


घटनास्थळी आढळलेल्या तरुणाची ओळख सुरुवातीला पटत नव्हती. अशातच त्याच्या खिशातील मोबाईलवर वारंवार फोन येत होते. पोलिसांनी आलेला फोन स्वीकारला असता, समोरून बोलणाऱ्या सैय्यान शेख यांनी जखमी तरुण आपला चुलत भाऊ रमजान शेख रोजान शेख असल्याचे सांगितले. रमजान हा अहमदाबादहून रेल्वेने पश्चिम बंगालमधील मालदा येथे जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. मोबाईलवरील या फोनमुळे अखेर अनोळखी तरुणाची ओळख पटली आणि त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधणे शक्य झाले.



तपासणीनंतर डॉक्टरांनी केले मृत घोषित


तरुण गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज राजपूत यांनी तपासणी केल्यानंतर रमजानला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत चर्चा सुरू आहे.



रेल्वेतून पडला की घातपात ? पोलिसांकडून तपास सुरू


रमजानचा मृत्यू रेल्वेतून पडल्यामुळे झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनेचे गूढ कायम आहे. नरडाणा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून प्राथमिक माहिती गोळा केली आहे. रमजान कोणत्या रेल्वेगाडीतून प्रवास करत होता, प्रवासादरम्यान नेमके काय घडले आणि तो रेल्वे रुळाशेजारी कसा पोहोचला, याचा तपास केला जात आहे.


तसेच संबंधित रेल्वे मार्गावरील हालचाली आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील पोलीस तपासानंतरच रमजानच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अहमदाबादहून आपल्या गावी परतणाऱ्या तरुणाचा अशा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता या प्रकरणाच्या तपासातून नेमके सत्य काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Election commission of India SSR Process: 6 राज्यांत सुरु होणार SSR प्रक्रिया; केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा

Election commission of India SSR Process: केंद्रीय निवडणूक आयोगाने सहा राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार याद्यांच्या विशेष

मेक्सिकोचे विद्यार्थी पाथर्डीत! तिलोक जैन विद्यालयात जोरदार स्वागत; भारतीय नोकऱ्यांचे आकर्षण वाढणार?

पाथर्डी (प्रतिनिधी) : जागतिक पातळीवर सर्व क्षेत्रांमध्ये बदलाचा वेग सध्या खूप वाढला आहे. जग झपाट्याने बदलत असून

FDA Maharashtra: दोन-तीन दिवसांपेक्षा जुनी मिठाई खरेदी करू नका! 

मुंबई : दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये मिठाई आणि खव्याच्या खरेदीला वेग आला असतानाच भेसळयुक्त आणि

Diwali 2026: दिवाळीत तुम्ही भेसळयुक्त मिठाई तर नाही खात आहात ना? मिठाई खरेदी 'या' गोष्टी एकदा नक्की तपासा

Diwali 2026: दिवाळीचा सण म्हणजे रोषणाई, फराळ, मिठाई, फटाके. फराळासोबतच मिठाईचीही रेलचेल आपल्या प्रत्येकाच्या घरी असते.

Cristiano Ronaldo Retirement : 23 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास संपणार ! रोनाल्डोचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला निरोप

Cristiano Ronaldo Retirement : जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

Blinkit Ambulance Service : बिगर-आणीबाणीच्या प्रवासासाठी आता २५०० रुपये शुल्क

ब्लिंकिट ॲम्ब्युलन्स (Blinkit Ambulance) या मोफत ॲम्ब्युलन्स सेवा पुरवणाऱ्या उपक्रमाने आपल्या धोरणात महत्त्वाचा बदल केला