Shivsena Diwali: शिवसेनेकडून 7 लाख 69 हजार दिवाळी शिधांचे वितरण; शेतकऱ्यांसाठी शिवसेनेच्या शाखा बनणार ‘शेतकरी सेवा केंद्र’

प्रत्येक शेतकऱ्याला संकटात मदत करण्याच्या उद्देशातून शिवसेनेकडून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त 7 लाख 69 हजार दिवाळी शिधा किट्स दिले जाणार आहेत. त्यापैकी 5 लाख 38 हजार 500 दिवाळी शिधांच्या किट्सचे वाटप देखील करण्यात आले आहे.

Shivsena Diwali: प्रत्येक शेतकऱ्याला संकटात मदत करण्याच्या उद्देशातून शिवसेनेकडून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त 7 लाख 69 हजार दिवाळी शिधा किट्स दिले जाणार आहेत. त्यापैकी 5 लाख 38 हजार 500 दिवाळी शिधांच्या किट्सचे वाटप देखील करण्यात आले आहे. उर्वरित किट्स दोन दिवसांत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते, माजी खासदार आनंद परांजपे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे निर्देश दिले असून येत्या तीन दिवसांत शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतील. आज बाळासाहेब भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच राज्यातील मराठवाडा, नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर भागातील 278 तालुक्यांमधील शेतकरी कुटुबियांना दिवाळी किट्स देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


यावेळी आनंद परांजपे म्हणाले की, 1972 नंतर महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी केली होती, त्यानंतर राज्यात केंद्रीय पथकं आली आणि दुष्काळाची पाहणी करुन गेली, असे प्रतिपादन परांजपे यांनी केले.



तर दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली होती. शिवसेनेने आतापर्यंत मराठवाड्यात 1 लाख 77 हजार, नाशिक विभागात 1 लाख 35 हजार, पुणे विभागात 82 हजार, अमरावती विभागात 77,500, नागपूर 66 हजार दिवाळी शिधा किट्स वितरित केले गळी आहेत. तसेच 10 हजार उसतोड कामगारांनाही दिवाळी शिधाचे किट्स दिल्याचे परांजपे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, कोकणात शेवटच्या टप्प्यात दिवाळी शिधाचे किट्स वितरित होतील, अशी माहिती परांजपे यांनी दिली.


राज्य सरकारने आत्तापर्यंत 358 तालुक्यांपैकी 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. शिवसेनेने त्यातील 278 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना दिवाळी शिधा दिला. राज्यात जेव्हा जेव्हा संकट येते, तेव्हा शिवसेना आणि एकनाथ शिंदे सर्वात आधी धावून जातात, असे समीकरण आहे. दसऱ्याच्या दिवशी ठाण्यातून 60 ट्रक आणि मुंबईतून 40 ट्रक दिवाळी शिधा रवाना केला होता. आतापर्यंत एकूण 5 लाख 38 हजार 500 दिवाळी शिधा किट्स शेतकऱ्यांना देण्यात आले. शिवसेना डॉक्टर सेलच्या माध्यमातून गरिबांना 5000 दिवाळी शिधा दिला जाणार आहे, असे देखील परांजपे म्हणाले.


तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची कामे होत नाहीत, या तक्रारीवर परांजपे म्हणाले की शिंदे हे महायुतीच्या 232 आमदारांची कामे करतातच पण विरोधकांचीही कामे करतात. त्यामुळे कामाच्या बाबतीत राष्ट्रवादीचा कुठलाही आमदार उपमुख्यमंत्री शिंदे यांना केव्हाही भेटू शकतो, असे परांजपे म्हणाले.

Comments
Add Comment

Celebrate Diwali with farmers: शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

नागपूर : राज्यात एकीकडे दिवाळीचे वातावरण तर दुसरीकडे शेतकरी बांधवांची दुष्काळी परिस्थिती,अशा वेळी त्यांना आधार

मेक्सिकोचे विद्यार्थी पाथर्डीत! तिलोक जैन विद्यालयात जोरदार स्वागत; भारतीय नोकऱ्यांचे आकर्षण वाढणार?

पाथर्डी (प्रतिनिधी) : जागतिक पातळीवर सर्व क्षेत्रांमध्ये बदलाचा वेग सध्या खूप वाढला आहे. जग झपाट्याने बदलत असून

160 Crore Package: आदिम जमाती आणि पारधी समाजासाठी 160 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज

मुंबई(सुहास शेलार): राज्य शासनाने ‘विकसित महाराष्ट्र 2047’ अंतर्गत कातकरी, कोलाम व माडिया या आदिम जमातींसह पारधी

एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये दिवाळी भेट! पात्र कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये सण उचल; महागाई भत्ता 60 टक्क्यांवर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी

सिंधुदुर्ग–नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू; पालकमंत्री नितेश राणेंची कोकणवासीयांना साद ‘येवा, कोकण आपलोच आसा!’

सिंधुदुर्ग : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ ते नवी मुंबईदरम्यानच्या विमानसेवेचे

MPSC Mega Bharti: एमपीएससीच्या गट-क परीक्षेतील पदसंख्या 16 हजारांवर जाणार?

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी जाहीर झालेल्या पदसंख्येत