IPL 2027: सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात डील, या चार खेळाडूंची आदलाबदल

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. पुढच्या महिन्यात लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी फ्रेंचायझी आपल्या संघाला आवश्यक असलेल्या खेळाडूंसाठी ट्रेड करत आहेत. आता चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळाडूंची ट्रेड झाली आहे. चला जाणून घेऊयात...

आयपीएल 2027 स्पर्धेच्या लिलावापूर्वी रिटेन्शन डेडलाईन जवळ येत आहे. त्यामुळे फ्रेंचायझींमधील हालचाली वेगाने वाढल्या आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूंच्या मागणीसाठी जोर लावला जात आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्यासाठी कोण बोली लावणार? याकडेही लक्ष लागून आहे. असं असताना दोन संघांनी चार खेळाडूंची आदलाबदल केली आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स या फ्रेंचायझींनी आपल्याला आवश्यक असलेल्या खेळाडूंची आदलाबदल केली आहे. यात लियाम लिव्हिंगस्टोन, खलील अहमद, नाथन एलिस आणि जॅक एडवर्ड्स या खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलने गुरूवारी एक निवेदन जाहीर करत याबाबतची माहिती दिली आहे. यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सने 2-2 खेळाडू बदलले आहेत.

कोणाचा फायदा? कोणाचं नुकसान?


सनरायझर्स हैदराबादने लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्ससाठी चेन्नई सुपरकिंग्ससोबत ट्रेड केलं आहे. या बदल्यात चेन्नई सुपर किंग्सने खलील अहमद आणि नाथन एलिसला सनरायझर्स हैदराबादला दिलं आहे. या ट्रेडमध्ये फक्त खेळाडूंची अदलाबदल झाली आहे. यात कोणतीही रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे या करारामुळे सर्वात जास्त नुकसान हे लियाम लिव्हिंगस्टोनचं झालं आहे. कारण इंग्लंडच्या आक्रमक अष्टपैलू खेळाडू असलेल्या लिव्हिंगस्टोनची सॅलरी निम्म्यावर आली आहे. कारण मागच्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने 13 कोटी रुपये मोजून त्याला संघात घेतलं होतं. पण आता फ्रेंचायझीने त्याला फक्त 6 कोटी रूपयात ट्रेड केलं आहे. लिव्हिंगस्टोनने मागच्या पर्वात फक्त 2 सामने खेळले होते आणि 15 धावा केल्या होत्या.



लियाम लिव्हिंगस्टोनला चेन्नई सुपर किंग्सकडून आता 6 कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच लिव्हिंगस्टोनचं 7 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू जॅक एडवर्ड्सने सनरायझर्स हैदराबादने मागच्या वर्षी 3 कोटींना खरेदी केली होती. याच रकमेत चेन्नई सुपर किंग्सने त्याला घेतलं आहे. तर चेन्नई सुपर किंग्सने खलीलला 4.8 कोटी घेतलं होतं. पण मागच्या दोन पर्वात त्याने निराशा केली होती. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने त्याला ट्रेड केलं. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन एलिसला चेन्नई सुपर किंग्सने 2 कोटींच्या बेस प्राईसवर ट्रेड केलं आहे.
Comments
Add Comment

38 व्या वाढदिवशी किंग कोहलीचा धमाका! बीसीसीआय आणि क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव, वाचून थक्क व्हाल!

भारतीय क्रिकेटचा 'किंग' आणि लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा स्टार फलंदाज विराट कोहली आज आपला 38 वा वाढदिवस

सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा मैदानात, टी20 संघाचं कर्णधारपद भूषवणार; आता दोन ट्रॉफीवर नजर

भारताने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात जिंकली. पण त्यानंतर त्याला संघात काही

WPL 2027: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचं बिगुल वाजलं, असं आहे वेळापत्रक; सर्व माहिती एका क्लिकवर

वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धेसाठी नुकतीच मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली होती. या लिलाव प्रक्रियेनंतर स्पर्धा

न्यूझीलंडच्या 11व्या क्रमांकाच्या खेळाडूसोबत गुरनूर ब्रारचा राडा! बाद करण्यासाठी अशी क्लुप्ती वापरली Video

भारताने न्यूझीलंडला पहिल्या वनडे सामन्यात 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात न्यूझीलंडने फक्त 185 धावांचं

विराट-अर्शदीपवर भारी पडला 25 वर्षांचा गोलंदाज! फक्त 2 विकेट्स घेत अंशुलने कसा हिसकावला सामनावीरचा किताब?

[caption id="attachment_1072203" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या

IND VS NZ: पहिला वनडे सामना कुठे फिरला? कर्णधार शुभमन गिलने शून्यावर बाद झालेल्या रोहितला दिलं श्रेय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेची सुरूवात विजयाने झाली आहे. पहिल्याच वनडे सामन्यात भारताने