कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांसाठी मोठा दिलासा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 'एसआरए'ला डीपीआर सादर करण्याचे निर्देश

कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी 'एसआरए'ने डीपीआर सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून, चेंबूर, कुर्ला व चांदिवली मतदारसंघातील विविध नागरी समस्यांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

मुंबई: कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगत वर्षानुवर्षांपासून वास्तव्यास असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा मार्ग आता सुकर होणार आहे. या झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) तात्काळ सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे चेंबूर, कुर्ला आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघातील विविध नागरी समस्या, पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.


या महत्त्वाच्या बैठकीस माजी खासदार प्रकाश आंबेडकर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, आमदार दिलीप लांडे, आमदार मंगेश कुडाळकर आणि सुजात आंबेडकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



रेल्वे मंत्र्यांशी थेट चर्चा


कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील चिखलवाडी, आरसीएफ-प्रियदर्शनी ते माहुलपर्यंत रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा बैठकीत गांभीर्याने मांडण्यात आला. रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्यामुळे स्थानिकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेऊन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी थेट दूरध्वनीवरून चर्चा केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून एसआरएसह महापालिका प्रशासनाने समन्वयाने काम करून तातडीने डीपीआर तयार करावा, असे निर्देश त्यांनी दिले.



बैठकीतील इतर प्रमुख निर्णय आणि मुद्दे:




  • पालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा पुनर्विकास: खारदेव नगर येथील महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बैठ्या पत्रा चाळ वसाहतीचा एसआरएच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यावर चर्चा झाली. तसेच कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी आकारण्यात येणाऱ्या प्रीमियमबाबत नवीन धोरण राबवण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले.




  • निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न: महापालिकेची निवासस्थाने निवृत्तीनंतर तात्काळ खाली न केल्यामुळे कर्मचाऱ्यांचे रोखलेले आर्थिक लाभ आणि पेन्शन पूर्णपणे थांबवणे अयोग्य असल्याचे स्पष्ट करत, अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लागलेल्या कुटुंबांच्या प्रकरणांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे निर्देश देण्यात आले.




  • म्हाडा वसाहतींमधील मलनिःसारण समस्या: कुर्ला मतदारसंघातील नेहरू नगर, टिळक नगर, सहकार नगर आणि नवीन टिळक नगर म्हाडा वसाहतींमधील ड्रेनेज व मलनिःसारण वाहिन्यांच्या समस्या दूर करण्यासाठी यंत्रणांना संयुक्त कारवाईचे आदेश दिले. साबळे नगर, क्रांती नगर, संतोषीमाता नगर आणि बर्मा सेल लाईनवरील रेल्वे प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनावरही चर्चा झाली.




  • चांदिवलीतील नागरी प्रश्न: आमदार दिलीप लांडे यांनी चांदिवली मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मांडले. यात साकीनाका पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी पालिकेचा भूखंड उपलब्ध करून देणे, डोंगरउतार व पायथ्याशी असलेल्या धोकादायक वस्त्यांचे सुरक्षित स्थलांतर करणे आणि साकीनाका परिसरातील हरित पट्टा निवासी विभागात समाविष्ट करण्याच्या मुद्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.



Comments
Add Comment

मध्य रेल्वेचे 75 गौरवशाली वर्ष पूर्ण; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दिमाखात साजरी झाली 'हेरिटेज वॉक'

मुंबई: भारतीय रेल्वेच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या मध्य रेल्वेने आपल्या स्थापनेची 75 गौरवशाली वर्षे

दिवाळीत फटाक्यांच्या प्रदूषणावर NMMCचा वॉच! नवी मुंबईतील 8 विभागांसाठी हेल्पलाइन जाहीर

नवी मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने (NMMC)

एमपीएससीच्या 9 परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणाला वेग; चौकशी आयोगाकडून प्रतिज्ञापत्रात निवेदने सादर करण्याचे आवाहन!

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या तब्बल 9 विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका आणि

SRA Redevelopment Mumbai: एसआरए प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प सरसावणार; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : सह्याद्री अतिथीगृह येथे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची 45 वी बैठक आज उपमुख्यमंत्री एकनाथ

Mangal Prabhat Lodha: केवळ 300 चौ. फुटांत सुरू होणार कौशल्य प्रशिक्षण केंद्र! महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 100 केंद्रांना मान्यता

[caption id="attachment_1072592" align="aligncenter" width="800"] मुंबईतील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आवारातील दक्ष हॉल येथे महात्मा ज्योतिबा फुले

Central Railway Mega Block : 8 नोव्हेंबरला लोकल प्रवाशांचे हाल होणार; माटुंगा-मुलुंड आणि पनवेल-वाशी मार्गावर गाड्या रद्द, वेळापत्रक कोलमडणार

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रूळांची दुरुस्ती आणि विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण