SRA Redevelopment Mumbai: एसआरए प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प सरसावणार; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

सह्याद्री अतिथीगृह येथे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची 45 वी बैठक आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश दिले.

मुंबई : सह्याद्री अतिथीगृह येथे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची 45 वी बैठक आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश दिले. रखडलेल्या प्रकल्पांची जबाबदारी स्वीकारून त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.


या बैठकीत पुनर्वसन प्रकल्पांची सद्यस्थिती, संक्रमण सदनिकांचे थकीत भाडे आणि परवडणाऱ्या घरांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. खासगी विकासकांकडे वितरित करण्यात आलेल्या 667 संक्रमण सदनिकांच्या भाड्याची मोठी रक्कम अद्याप बाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी संबंधित विकासकांकडे पाठपुरावा वाढवून निश्चित कालावधीत वसुली पूर्ण करावी, असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.



कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरच्या पुनर्विकासाला चालना


कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमधील समूह पुनर्विकास योजनांनाही गती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कल्याण-डोंबिवली परिसरात सहा समूहांचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. तर उल्हासनगरमध्ये 29 हून अधिक समूहांच्या पुनर्विकासाचे काम पुढे नेले जात आहे. या प्रकल्पांसाठी सर्वेक्षण, नियोजन आणि सल्लागार नियुक्तीची कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.


बदलापूर आणि माणिवलीत 9920 घरांचे नियोजन


प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बदलापूरच्या जोवेली येथे 4,590 आणि कल्याण तालुक्यातील माणिवली येथे 5,330 परवडणारी घरे बांधण्याचा प्रस्ताव आहे. या दोन्ही प्रकल्पांमधून एकूण 9920 घरांची निर्मिती होणार आहे. या योजनांचा आढावा घेताना घरांचे बांधकाम दर्जेदार असावे, यावर शिंदे यांनी भर दिला. प्रकल्पांच्या उभारणीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे वास्तुविशारद आणि विकासकांचा सहभाग घेण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.


शिवशाहीच्या प्रशासकीय कामकाजात सुधारणा


शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे काम अधिक प्रभावीपणे आणि वेगाने पार पडावे, यासाठी संस्थेच्या सुधारित आकृतिबंधासह सेवाशर्ती नियमावलीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच उर्वरित प्रकल्प पूर्ण करणे, थकीत भाडे वसूल करणे आणि परवडणाऱ्या घरांची निर्मिती वाढवणे या बाबींना प्राधान्य देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.


या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक लहू माळी तसेच संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

एमपीएससीच्या 9 परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणाला वेग; चौकशी आयोगाकडून प्रतिज्ञापत्रात निवेदने सादर करण्याचे आवाहन!

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या तब्बल 9 विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका आणि

कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे ट्रॅकलगतच्या झोपडीधारकांसाठी मोठा दिलासा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 'एसआरए'ला डीपीआर सादर करण्याचे निर्देश

मुंबई: कुर्ला-ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे ट्रॅकलगत वर्षानुवर्षांपासून वास्तव्यास असलेल्या झोपडीधारकांच्या

Mangal Prabhat Lodha: केवळ 300 चौ. फुटांत सुरू होणार कौशल्य प्रशिक्षण केंद्र! महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 100 केंद्रांना मान्यता

[caption id="attachment_1072592" align="aligncenter" width="800"] मुंबईतील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आवारातील दक्ष हॉल येथे महात्मा ज्योतिबा फुले

Central Railway Mega Block : 8 नोव्हेंबरला लोकल प्रवाशांचे हाल होणार; माटुंगा-मुलुंड आणि पनवेल-वाशी मार्गावर गाड्या रद्द, वेळापत्रक कोलमडणार

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रूळांची दुरुस्ती आणि विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण

FDA Maharashtra: दोन-तीन दिवसांपेक्षा जुनी मिठाई खरेदी करू नका! 

मुंबई : दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये मिठाई आणि खव्याच्या खरेदीला वेग आला असतानाच भेसळयुक्त आणि

मुंबईकरांनो सावधान! दिवाळीत घाम फुटणार की हुडहुडी भरणार? हवामानाचा हा भयानक अंदाज वाचून थक्क व्हाल!

मुंबईत यंदाची दिवाळी गरम हवामान आणि खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या सावटाखाली साजरी करावी लागणार आहे. सकाळी