ग्लॅमर अभिनेत्री आणि Miss Heritage International किताबाची मानकरी असलेली शितल उपरे हिने अलीकडेच आपला साखरपुडा उरकला.
November 5, 2026 02:08 PM
ग्लॅमर अभिनेत्री आणि Miss Heritage International किताबाची मानकरी असलेली शितल उपरे हिने अलीकडेच आपला साखरपुडा उरकला.
सोशल मीडियावर शितल उपरे हिने साखरपुड्याची आनंदाची बातमी शेअर करत आयुष्यातील एका सुंदर नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.
शितलने अमित सिंघ यांच्याशी साखरपुडा केला असून, या जोडीचे रोमँटिक प्रपोजल फोटो सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहेत.
अभिनेत्री शीतल उपरे आपल्या साध्या पण आकर्षक व्यक्तिमत्त्वाने नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते. निळ्या साडीतील तिचा सुंदर आणि पारंपरिक लुक खास लक्षवेधी ठरत आहे.
नुकताच तिने दिवाळी स्पेशल फोटोशूट केले आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
चित्रपट, टेलिव्हिजन, थिएटर आणि The Legend of Hanuman मधील व्हॉइस आर्टिस्ट्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या Shital या इमोशनल वेलनेस कोच असून Singapore Airlines मध्ये माजी केबिन क्रू म्हणूनही कार्यरत होत्या.
भारतासाठी दोन प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पहिल्या भारतीय तरुणी म्हणून देखील ती ओळखली जाते.