Friday, November 6, 2026

इयत्ता १०वी आणि १२वीच्या सीबीएसई बोर्डच्या परीक्षा जाहीर; १६ फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात

सीबीएसई बोर्डच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर. १६ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू

सीबीएसई बोर्डच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर. १६ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२७ च्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली असून मंडळाच्या माहितीनुसार, अनुक्रमे १०वी व १२वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारी सुरू होणार आहेत. सकाळी १०:३० वाजता विद्यार्थ्यांना आत सोडले जाईल. विद्यार्थी अधिक माहितीकरिता तसेच वेळापत्रक पाहण्यासाठी CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर पाहू शकतात, तिथे परीक्षेच्या संपूर्ण तारखा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळापत्रक (Date Sheet) परीक्षा सुरू होण्याच्या १०१ दिवस आधीच जाहीर करण्यात आले आहे. १० वीचे विद्यार्थी ८३ विषयांमध्ये, तर १२ वीचे विद्यार्थी १२१ विषयांमध्ये परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे सामान्यत: विद्यार्थ्यांनी एकत्र निवडलेल्या दोन प्रमुख विषयांच्या परीक्षांमध्ये पुरेसे अंतर (Gaps) देण्यात आले आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांचे (Entrance Exams) संभाव्य वेळापत्रक लक्षात घेऊन बोर्ड परीक्षा आधी संपवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परीक्षा केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी एकाच दिवशी येणाऱ्या परीक्षार्थींच्या संख्येचा विचार करण्यात आला आहे. मूल्यमापन प्रक्रियेदरम्यान शिक्षकांना त्यांच्या शाळांमधून जास्त काळ अनुपस्थित राहावे लागू नये, अशा पद्धतीने वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे दोन विषय एकाच दिवशी येऊ नयेत म्हणून ४०,००० पेक्षा जास्त विषयांच्या संयोजनांची (Subject Combinations) काळजी घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२६च्या परीक्षेचे वेळापत्रक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आले होते. इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमुख प्रवेश परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक विचारात घेण्यात आले आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >