Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात घरात घुसून दोन बहिणींवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री सेक्टर 1 मध्ये ही घटना ...
मुहूर्त ट्रेडिंगचे वेळापत्रक
मुहूर्त ट्रेडिंगसाठी विविध सत्रांच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत.
- ब्लॉक डील विंडो: दुपारी 1:50 ते 2:05
- प्री-ओपन सत्र: दुपारी 2:05 ते 2:20
- मुख्य ट्रेडिंग सत्र: दुपारी 2:20 ते 3:30
- समारोप सत्र (CAS वगळून): दुपारी 3:30 ते 3:50
- समारोप सत्र (CAS): दुपारी 3:35 ते 3:50
- पोस्ट-क्लोजिंग सत्र: दुपारी 3:50 ते 4:00
नोव्हेंबरमध्ये शेअर बाजार कधी बंद राहणार?
दिलेल्या एक्सचेंज कॅलेंडरनुसार, नोव्हेंबर महिन्यातील शनिवार आणि रविवारच्या नियमित सुट्ट्यांव्यतिरिक्त 10 नोव्हेंबर रोजी दिवाळी-बलिप्रतिपदा आणि 24 नोव्हेंबर रोजी श्री गुरु नानक देव प्रकाश गुरुपूरनिमित्त बाजार बंद राहणार आहे.
नोव्हेंबरमधील शनिवार आणि रविवारच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत:
- शनिवार: 7, 14, 21 आणि 28 नोव्हेंबर
- रविवार: 8, 15, 22 आणि 29 नोव्हेंबर
8 नोव्हेंबरला नियमित रविवारची सुट्टी असली, तरी मुहूर्त ट्रेडिंगसाठी विशेष सत्र आयोजित केले जाईल.
काय आहे मुहूर्त ट्रेडिंग?
मुहूर्त ट्रेडिंग ही भारतीय शेअर बाजारातील जुनी परंपरा आहे. दिवाळीच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या या विशेष सत्रात अनेक गुंतवणूकदार नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणून शेअर्सची प्रतीकात्मक खरेदी करतात. हिंदू परंपरेनुसार देवी लक्ष्मीला धन आणि समृद्धीची देवता मानले जाते. त्यामुळे या दिवशी गुंतवणूक करणे शुभ मानण्याची अनेक गुंतवणूकदारांची श्रद्धा आहे.