Pune Airport: पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई, बँकॉकहून ड्रॅगन फ्रूटच्या पॅकेटमध्ये केली जात होती गांजाची तस्करी

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने करोडोंचा अंमली पदार्थ ताब्यात घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीला पोलिसांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पुणे: अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात एक मोठे यश मिळवत, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम विभागाने बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाला अटक केली आहे. प्रवाशाच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता, अधिकाऱ्यांना तब्बल 10.642 किलोग्रॅम उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजा ताब्यात घेतला आहे. जप्त केलेल्या या अमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय बाजारात एकूण अंदाजित मूल्य सुमारे 3.72 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून सुमारे 3.72 कोटी रुपये किमतीचा 10.642 किलो हायड्रोपोनिक वीड हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असल्याची माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.



"फ्रीझ ड्राइड मंथाँग ड्युरियन" असं लेबल लावलेल्या व्हॅक्यूम- सील केलेल्या पाकिटांमध्ये हे अंमली पदार्थ लपवण्यात आले होते. हे पॅकेट प्रवाशाच्या चेक- इन सामानांमध्ये नूडल्ससारख्या इतर खाद्यपदार्थांमध्ये लपवण्यात आले होते. पुण्याच्या कस्टम विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला एनडीपीएस कायद्यान्वये अटक करण्यात आली असून, त्याला 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय तस्करी टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. बँकॉकहून पुण्याला येणाऱ्या एका प्रवाशाकडून 3.72 कोटी रुपये किंमतीचे हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती, पुणे सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त धीरम मोरे यांनी दिले आहे.


 


पुणे सीमाशुल्क विभागाने केलेल्या तपासणीदरम्यान, बँकॉकवरून पुण्यामध्ये आलेल्या प्रवाशाने आपल्या सामानात अंदाजे 10.6 किलोग्रॅमचा हायड्रोपोनिक गांजा लपवलेला होता. या अंमली पदार्थाचे बाजारमूल्य अंदाजे 35 लाख रुपये प्रति किलोग्रॅम इतके होते. या संपूर्ण मालाचे एकूण मूल्य अंदाजे 3.72 कोटी रुपये इतके आहे. पुणे सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त धीरज मोरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना सांगितले की, "बँकॉकवरून पुण्यामध्ये आलेल्या विमानातील एका प्रवाशाकडे प्रतिबंधित अंमली पदार्थाचा मोठ्या प्रमाणावरचा साठा आढळून आला आहे. तपासणीदरम्यान, प्रवाशाने आपल्या सामानात अंदाजे 10.6 किलोग्रॅमचा हायड्रोपोनिक गांजा लपवले असल्याचे आढळून आले. 'हायड्रोपोनिक गांजा'ने भरलेली नऊ पाकिटे सापडली आहेत. आज कस्टम विभागाला तस्करीची एक नवीन पद्धत उघडकीस आली आहे. थायलंडमध्ये विकल्या जाणाऱ्या 'दुरियन' नावाच्या सुक्या फळाच्या पाकिटांमध्ये हे अंमली पदार्थ लपवले होते."


Comments
Add Comment

अन्न- औषध प्रशासनाचा हेअर ऑईल कंपनीला दणका, खोटी जाहिरात केल्यामुळे नाशिकमध्ये धडक कारवाई

मुंबई: इन्स्टाग्राम, फेसबूक यांसारख्या सोशल मीडियावरून टक्कल असलेल्या व्यक्तींना केस उगवणे आणि केसांची वाढ

Farmers Relief: दुष्काळग्रस्त 87 लाख 45 हजार शेतकऱ्यांना 4 हजार 372 कोटींची दिवाळी अग्रीम मदत

मुंबई(सुहास शेलार): राज्यातील 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा

Ahilyanagar News: टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना फराळाचे वाटप, पुण्याच्या आनंद यात्री मंडळाचा स्तुत्य उपक्रम

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये सध्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे दिवाळी सणाचा

Ahilyanagar Diwali News: वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून उजळले संस्कारांचे दीप; जेएसएस गुरुकुलचा उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आनंद आणि नवीन कपड्यांची खरेदी नव्हे, तर

अहिल्यानगर पोलिसांची विशेष मोहीम, 87 मोबाईल हस्तगत करुन मूळ मालकांना सुपूर्द

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर शहर उपविभागातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेले किंवा चोरीला

मराठवाड्यातील पाणीटंचाईवर मोठा निर्णय! ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाला गती, जायकाकडून 20 हजार कोटींच्या निधीचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई: मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढून हा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने