Kirit Somaiya letter to CM : मुंबईतील हिंदू-मुस्लिम जन्मदराच्या अभ्यासासाठी विशेष समिती नेमा! भाजप नेते किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईत मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढत असल्याचा दावा करत त्यांनी गेल्या पाच वर्षांतील जन्मनोंदणीची आकडेवारी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली.

मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढत असल्याचा दावा


मुंबई : मुंबईतील लोकसंख्येतील बदलाचा मुद्दा उपस्थित करत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyaa) यांनी हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या जन्मदराच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केली आहे. मुंबईत मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढत असल्याचा दावा करत त्यांनी गेल्या पाच वर्षांतील जन्मनोंदणीची आकडेवारी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली.



सोमय्या यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये मुंबईत ७० हजार ३८० हिंदू मुलांचा, तर ४८ हजार ५५४ मुस्लिम मुलांचा जन्म झाला. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीत ३ लाख ३६ हजार ६२५ हिंदू मुलांचा आणि २ लाख २० हजार ७५४ मुस्लिम मुलांचा जन्म झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आकडेवारीच्या आधारे हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या जन्माचे प्रमाण ३:२ असल्याचा दावा त्यांनी केला.


मुंबईतील काही भागांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात बदल होत असल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे. या बदलांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी विशेष लोकसंख्याशास्त्रीय समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. जन्मदराशी संबंधित आकडेवारीची पडताळणी करून तिचा तपशील जनतेसमोर आणावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Comments
Add Comment

Borivali Accident News : बोरिवलीत काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना : दोन गाड्यांच्या मध्ये चिरडून अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; आरोपी डॉक्टरला जामीन मंजूर

मुंबई : मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरात एका अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक अपघातात अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा

Mantralaya Diwali Celebration: ‘आपलं मंत्रालय’च्या काव्यसंध्येने दीपोत्सवात फुलला शब्दांचा आनंदोत्सव; अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक कलागुणांसाठी व्यासपीठ

मुंबई : राज्यात सगळीकडे दिवाळीनिमित्त आनंदाचे वातावरण आहे. नोकरदार वर्ग ऑफिसमध्ये आनंदाने दिवाळी साजरी करतात.

Mumbai Crime News : 'पत्ता सांगता का?' असं विचारलं अन् पुढच्याच क्षणी... कांदिवलीत वृद्ध महिलेसोबत घडलेली थरार घटना, पहा Video

कांदिवली: मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून चोरट्याने

Mumbai Drain Cleaning : नालेसफाईच्या कामांवरील खर्च कमी करणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील नाल्यांच्या सफाईच्या कामांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जाते. दरवर्षी

BMC : मुंबईतील समुदाय संघटकांचे पगार लांबणीवर, पगाराचा प्रस्ताव उशिराने सादर झाल्याने दिवाळी जाणार कोरडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी तत्वावर

Vantara : गुजरातमधून सिंह आणण्यासाठी महापालिकेला वनताराची होणार मदत?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थातच राणीबागेत चार