Friday, November 6, 2026

वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, टी20 संघाची धुरा सांभाळणार

युवा डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. बिहारच्या वरिष्ठ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ संघाचे नेतृत्व करण्याची वैभवची पहिलीच वेळ असेल.

1/5 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला 14 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आल आहे. तसेच नेतृत्व करण्याची जबाबदारी वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. तर सूरज कश्यपची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Photo: ANI) 2/5 वैभव सूर्यवंशी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी किंवा जगातील इतर कोणत्याही टी20 फॉरमेट स्पर्धेत संघाचे नेतृत्व करणारा सर्वात तरुण कर्णधार ठरणार आहे. यापूर्वी त्याने दुलीप ट्रॉफीचे कर्णधारपद भूषवले होते. बिहार क्रिकेट असोसिएशनने फक्त पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. या सामन्यांचं कर्णधारपद वैभवकडे असेल. (Photo: ANI) 3/5 बिहार क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी संघाची घोषणा केली. बिहारचा पहिला सामना 14 नोव्हेंबर रोजी इंदूरमध्ये असून समोर सौराष्ट्र संघ असेल. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बिहारला 'ब' गटात ठेवण्यात आले आहे. या गटात दिल्ली, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, रेल्वे, सौराष्ट्र आणि तामिळनाडू या संघांचा समावेश आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हर्ष वर्धन म्हणाले की, कर्णधारपद मिळाल्याने वैभवला एक कर्णधार म्हणून विकसित होण्याची संधी मिळेल. (Photo: ANI) 4/5 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बिहार संघ: वैभव सूर्यवंशी (कर्णधार), सूरज कश्यप (उपकर्णधार), आयुष लोहारुका (यष्टीरक्षक), अनमोल कुमार (यष्टीरक्षक), आलोक कुमार, अल्तमश अश्रफ, परम कुमार सिंग, ऋत्विक राज, मयंक कुमार, राघवेंद्र प्रताप, आशिष कुमार, वासुदेव प्रताप सिंग, नवाझ खान, यजमान खान, मोहम्मद खान, यष्टिरक्षक. हिमांशू सिंग. (Photo: ANI) 5/5 क्रोएशियाचा जेक वुकोसिक हा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय कर्णधार होता. त्याने वयाच्या 17 वर्षे आणि 311 दिवसांचा असताना कर्णधारपद भूषवले होते. रशीद खानने वयाच्या 20 वर्षे आणि 350 दिवसांचा असताना कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद भूषवले होते. रशीद खानने वयाच्या 19व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अफगाण संघाचे कर्णधारपदही भूषवले होते. आता या सर्वांचा विक्रम वैभव सूर्यवंशी मोडेल. (Photo: ANI)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >