Madhuri Dixit son mystery girl Diwali party: 'धकधक गर्ल'ची होणारी सुनबाई कोण? माधुरीच्या लेकासोबत दिवाळी पार्टीमध्ये झाली स्पॉट; पाहा Video

माधुरी दीक्षित मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत पती डॉ. श्रीराम नेने आणि मुलगा अरिनसोबत पोहोचली होती. यावेळी अरिनसोबत दिसलेल्या मिस्ट्री गर्लने सर्वांचे लक्ष वेधले. ही तरुणी अरिनची कथित गर्लफ्रेंड असल्याची चर्चा असून पार्टीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा अभिनय आणि तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, यावेळी चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे तिचा मोठा मुलगा अरिन नेने आणि त्याच्यासोबत दिसलेली एक मिस्ट्री गर्ल! प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या दिवाळी पार्टीत माधुरी संपूर्ण कुटुंबासह पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत पती डॉ. श्रीराम नेने, मुलगा अरिन आणि एक तरुणीही दिसली. या चौघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून माधुरी लवकरच सासूबाई होणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.(Madhuri Dixit son Ryan Nene)



मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत नेने कुटुंबाची उपस्थिती


बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांचा उत्साह पाहायला मिळत आहे. अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी मुंबईतील त्यांच्या घरी भव्य दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्री माधुरी दीक्षितदेखील पती डॉ. श्रीराम नेने आणि मोठा मुलगा अरिन नेने यांच्यासोबत या पार्टीत सहभागी झाली होती. मात्र, यावेळी नेने कुटुंबासोबत आणखी एक तरुणी दिसल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले. अरिन आणि ही तरुणी एकत्र पार्टीत पोहोचल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाली.




कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?


माधुरीचा मुलगा अरिनसोबत दिसलेल्या या तरुणीला काही मीडिया रिपोर्ट्समध्ये खुशी असे म्हटले जात आहे. ती अरिनची कथित गर्लफ्रेंड असल्याची चर्चा आहे. दोघेही यापूर्वी अमेरिकेतील काही क्षण सोशल मीडियावर शेअर करत असल्याचेही वृत्त आहे. दिवाळी पार्टीतील व्हिडीओमध्ये ही तरुणी अरिन, माधुरी ,डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत पोज देताना दिसतात. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, अरिन किंवा माधुरीने त्यांच्या नात्याबाबत अथवा लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.(Madhuri Dixit son Arin Nene)



गुलाबी साडीतील माधुरीचा सुंदर अंदाज


या पार्टीत माधुरी दीक्षितने गडद गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. साडीला सॅटिन फिनिश असून तिच्या काठावर चंदेरी आणि पांढऱ्या रंगाचे नाजूक भरतकाम करण्यात आले होते. स्लीव्हलेस ब्लाउज, आकर्षक कानातले, डायमंड रिंग आणि मोती व क्रिस्टल्सने सजवलेली पोटली बॅग असा तिचा लूक होता. मोकळे कुरळे केस आणि हलक्या मेकअपमध्ये माधुरीचा पारंपरिक अंदाज चाहत्यांना विशेष आवडला. तिच्या या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.







डॉ. श्रीराम नेने यांचाही हटके लूक


माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी या पार्टीसाठी पांढऱ्या रंगाचा पेहराव निवडला होता. पांढऱ्या रंगाचे भरतकाम असलेले जॅकेट, त्याला साजेसा शर्ट आणि ट्राउझर असा त्यांचा लूक होता. माधुरी आणि श्रीराम नेने यांची जोडी पार्टीत लक्ष वेधून घेत होती.(Madhuri Dixit prospective daughter in law)



कोण आहे अरिन नेने?


माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांना दोन मुलगे आहेत. त्यापैकी अरिन हा त्यांचा मोठा मुलगा असून रायन हा धाकटा मुलगा आहे. अरिन नेने सामान्यतः प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतो. त्याने अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच करण जोहर यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्याचाही उल्लेख काही वृत्तांमध्ये आहे.



सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा


दिवाळी पार्टीतील माधुरी आणि तिच्या कुटुंबाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. माधुरीचा मुलगा मोठा झाल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काही चाहत्यांनी माधुरी आता सासूबाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, सध्या या सगळ्या चर्चा असून लग्न किंवा साखरपुड्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.(Madhuri Dixit son dating rumors)







Comments
Add Comment

Nana Patekar Memories:  नाना पाटकरांच्या आठवणीत क्रांती रेडकर भावुक, म्हणाली इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'...

Nana Patekar Memories: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. क्रांतीने 'मैत्रेया' (Maitreyaa)

Ramayana Movie: रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई!

रणबीर कपूरचा फेमस 'रामायण' चित्रपट अखेर 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या

Zee Marathi Diwali 2026 : लहानपणीची दिवाळी ते आजची दिवाळी… झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या खास आठवणी!

Zee Marathi Diwali 2026: दिवाळी सणाला सुरुवात झाली असून सगळीकडे रोषणाई, दिवे, आकाशकंदील यांचा झगमगाट पाहायला मिळत आहे.

Lalita Pawar : 'मंथरा'च्या भूमिकेने घराघरात पोहोचलेल्या ललिता पवार यांचे आयुष्य मात्र दुःखाने भरलेले होते, मृत्यूनंतर 3 दिवस घरात पडून होता मृतदेह

Lalita Pawar : नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटातील कलाकारांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात राम,

इमरान हाशमीचा खतरनाक अवतार! 'गनमास्टर जी9'चे नवीन पोस्टर रिलीज; बॉक्स ऑफिसवर होणार महाक्लॅश!

मुंबई: बॉलिवूडचा 'सिरियल किसर' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाशमी (Emraan Hashmi) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे

'जेलर 2' ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; रजनीकांतचा 'तो' अंदाज पुन्हा वेड लावणार!

मुंबई: रजनीकांत यांचे चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा