
मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) आपल्या प्रशिक्षण पद्धतींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. MCA ने सिंगापूरस्थित AI कंपनी 'लेव्हल अप स्पोर्ट्सलिटिक्स' सोबत करार केला आहे, जी बीकेसी येथील शरद पवार इनडोअर क्रिकेट अकादमीमधील प्रशिक्षकांसोबत काम करेल. आपल्या प्रशिक्षणात AI चा वापर करणारी मका ही पहिली संघटना आहे. प्रत्येक खेळपट्टीवर वेगवेगळ्या कोनांत चार कॅमेरे बसवलेले असतील, जे फलंदाजांचा प्रत्येक क्षण टिपतील. प्रशिक्षक गोलंदाजांसाठीही असेच करू शकतात. जर एखाद्या प्रशिक्षकाला खेळाडूच्या बॅक फूट शॉटचे विश्लेषण करायचे असेल तर तो एआय कंपनीने दिलेल्या ॲपमध्ये नाव टाईप करून त्या खेळाडूची संपूर्ण माहिती मिळवेल.
''आपल्याला काळानुसार बदलण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाने पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि कोणतेही ध्येय गाठण्यासाठी ते काय करू शकते हे आपल्याला दाखवत आहे. आम्ही आमच्या दैनंदिन नेट्स सत्रात AI चा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळे आमच्या प्रशिक्षकांना व खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी कसा फायदा होतो हे आम्ही पाहू. सध्या हा केवळ एक प्रायोगिक प्रकल्प आहे. यामुळे त्यांना कशी मदत झाली आहे, यावर आम्ही प्रशिक्षक आणि खेळाडूंकडून अभिप्राय घेऊ.'' असे एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक इंडियन एक्सप्रेस या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
[caption id="attachment_1073185" align="aligncenter" width="800"] नोव्हेंबर 2013 मध्ये ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडीजविरुद्ध मोहम्मद शमीने कसोटी पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने अचूक ...
अहवालात म्हटले आहे की, भागीदारी औपचारिक होण्यापूर्वी कंपनीने ऑगस्टमध्ये एमसीएला एक सादरीकरण केले होते आणि एक प्रायोगिक प्रकल्पही राबवला होता. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ, सितांशू डॅश म्हणाले की, या तंत्रज्ञानामुळे प्रशिक्षकांना प्रत्येक सत्रावर अतिरिक्त वेळ न घालवता अधिक खेळाडूंचे विश्लेषण करता येईल, ज्यामुळे त्यांची पोहोच लक्षणीयरीत्या वाढू शकेल. '' या तंत्रज्ञानामुळे प्रशिक्षकाची पोहोच २० ते १०० पटींनी वाढू शकते, असा आमचा विश्वास आहे. हे एआय प्रशिक्षकांना व्हर्च्युअली मदत करेल. हे प्रशिक्षकांच्या हातातील एक साधन आहे, ज्यामुळे ते कमी वेळेत अधिक काम करू शकतील'' असे डॅश यांनी अहवालात म्हटले आहे.






