35 हजार स्वयंसेवक प्रज्वलित करणार 30 लाख दिवे, अयोध्या नगरीत प्रस्थापित होणार 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड'

अयोध्येमध्ये यंदाची दिवाळी एकदम खास असणार आहे. अयोध्येतील 56 घाटांवर 35 हजार विद्यार्थी स्वयंसेवक 30 लाख दिवे सजवत 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड' स्वत:च्या नावावर प्रस्थापित करणार आहे.

अयोध्या: प्रभू श्रीरामाची पावन भूमी असलेल्या रामनगरी अयोध्येमध्ये यंदाचा दहावा दीपोत्सव आजवरचा सर्वाधिक भव्य आणि जागतिक विक्रम प्रस्थापित करणार आहे. राम की पैडी, सरयू नदीच्या तिरावर सह 56 घाटांवर 30 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित केले जाणार आहेत. अवध विश्वविद्यालयाच्या 35 हजार स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेत, आज (7 नोव्हेंबर शनिवार) एकाच वेळी मातीचे दिवे प्रज्वलित करत नवा 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड' प्रस्थापित करणार आहे. यंदाची दिवाळी अयोध्यावासीयांसाठी एकदम खास असणार आहे.



अयोध्येतील घाटांवर आज सायंकाळी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत एकाच वेळी दिवे लावण्यात येणार आहेत. यंदाचा दीपोत्सव, देशाचे उपराष्ट्रपती पहिल्यादांच रामनगरीतील या भव्य उत्सवाला उपस्थित राहणार असल्यामुळे, या दृष्टीनेही दिपोत्सव विशेष असणार आहे. दिपोत्सवाचे नोडल अधिकारी, प्राध्यापक एस. एस. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवध विश्वविद्यालयाचे स्वयंसेवक शनिवारी सकाळी दिव्यांमध्ये तेल आणि वाती भरण्यास सुरुवात करतील. यासाठी 900 घाट समन्वयक, 112 घाट प्रभारी आणि 27 पर्यवेक्षकांवर या विशेष कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.



यावेळी 2 हजार 100 ड्रोनचा आकाशातील अनोखा शो, तीन देशांच्या कलाकारांच्या अनोख्या कलाकृतीने आणि दिव्यांच्या लखलखाटाने अवघी अयोध्या रामनगरी उजळून निघणार आहे. अयोध्येच्या दीपोत्सवामध्ये परदेशातील कलाकार रामकथेचे सादरीकरण करणार आहेत. दक्षिण अफ्रिका, लाओस आणि श्रीलंका अशा तीन देशांतील कलाकार अयोध्येमध्ये रामकथेचे सादरीकरण करणार आहेत. यामध्ये श्रीलंकेच्या कलाकारांची 'रावणेश्वरा' हे सादरीकरण विशेष लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे. अनेक मिडिया रिपोर्टनुसार, अयोध्येमध्ये यावर्षी होणाऱ्या रामलीलेमध्ये रावणाला फक्त खलनायक म्हणून न दाखवता, तो एक प्रकांड विद्वान, कुशल राजा, चारही वेदांचा अभ्यासक, महान योद्धा, संगीत साधक आणि भगवान शंकराचा निस्सीम भक्त असा सर्वसमावेशक पैलू पारंपरिक श्रीलंकन नृत्य आणि संगीतातून उलगडला जाणार आहे. श्रीलंकेची पारंपरिक वेशभूषा, भव्य मुकुट आणि दागिन्यांसह होणारे हे सादरीकरण भारतीय भाविकांसाठी पर्वणी ठरेल.



अवध विद्यापीठाच्या 35 हजार विद्यार्थी स्वयंसेवकांनी अयोध्येतील 56 घाटांवर विशिष्ट भौमितिक ग्रिड्समध्ये 30 लाख दिवे सजवले आहेत. सरयू नदीच्या तिरावर, 2 हजार 187 पुरोहित, अर्चक आणि महिला यांच्या माध्यमातून एकाचवेळी महाआरती पार पडणार आहे. त्यानंतर घाटांवर ड्रोन शो सुद्धा पार पडणार आहे. राम की पैडीवर 2 हजार 100 ड्रोनच्या माध्यमातून अवकाशात रामायणातील वेगवेगळ्या सीन्सचे थ्रीडी लेझर शो आणि ग्रीन फायरवर्क्सच्या माध्यमातून शुटिंग केली जाणार आहे. त्यासाठी 300 फूट लांब आणि 50 फूट उंच सिनेमॅटिक फसाड स्क्रिन उभारण्यात येणार आहेत. यामुळे नक्कीच अयोध्येतील यंदाची दिवाळी देशवासीयांच्या लक्षात राहणार आहे. प्रभू श्री रामांच्या 14 वर्षांच्या वनवासानंतर लंकेवर विजय मिळवल्यानंतर अयोध्येमध्ये परतल्यानंतरचा क्षण जिवंत करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाने खास चित्र रेखाटले.



अयोध्येमध्ये, 30 फूट लांब, 12 फूट रुंद आणि 16 फूट उंच भव्य- दिव्य पुष्पक विमान तयार करण्यात आले आहे. शिवाय, रामकथा पार्कमध्ये 16 फूट लांब आणि 15 फूट उंच रामरथ सुद्धा तयार करण्यात आला आहे. त्या रामरथावर प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमंत या ऐतिहासिक पात्रांच्या प्रतिमा ठेवण्यात येणार आहेत. सोबतच, सरयू नदीत रामायण थीमवरील तीन विशेष बोटीही असणार आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या लोककलांचा आणि विविध संस्कतीचे दर्शन अयोध्यावासीयांना करता येणार आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यातील लोककलाकार अयोध्येच्या रस्त्यावर त्यांची कला सादर करणार आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी अयोध्यावासीयांना सहाजिकच सर्वच दृष्टीने एकदम खास ठरेल, यात शंका नाही.

Comments
Add Comment

BMW Gift to Son: मुलाला नववीत चांगले गुण मिळाल्यामुळे वडिलांनी गिफ्ट म्हणून दिली आलिशान कार; किमंत ऐकून व्हाल चकित

BMW Gift to Son: मुंबईत एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लाईटमन म्हणून काम करणाऱ्या एका तांदूळ व्यापाऱ्याने आपल्या निववीत

Vasundhara Police Station : गाझियाबादच्या पोलीस ठाण्यात मोठा स्फोट; उपनिरीक्षकासह डिलिव्हरी बॉय जखमी

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील वसुंधरा पोलीस ठाण्यात अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात खळबळ

आंध्र प्रदेशात 'मुरासू' चक्रीवादळाचा हाहाकार; 8 जणांचा मृत्यू, तब्बल 1900 कोटींहून अधिकचे अवाढव्य नुकसान!

अमरावती: आंध्र प्रदेशात 'मुरासू' (Murasu) चक्रीवादळाने अभूतपूर्व विध्वंस घडवला असून संपूर्ण राज्यात मानवी जीवनासह

SBI ची 904 कोटींची फसवणूक? किशोर बियाणी आणि फ्युचर रिटेलविरोधात CBI चा FIR!

मुंबई: देशातील अग्रगण्य रिटेल समूहांपैकी एक असलेल्या 'फ्युचर रिटेल लिमिटेड'च्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

इयत्ता १०वी आणि १२वीच्या सीबीएसई बोर्डच्या परीक्षा जाहीर; १६ फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात

सीबीएसई बोर्डच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

दक्षिण दिल्लीतील किया कार शोरूमला भीषण आग; 7 जण जखमी, 12 ते 15 जणांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील सैदुलाजाब परिसरात असलेल्या किया कार शोरूमला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याची