Saturday, November 7, 2026

Mumbai Crime : लोकल ट्रेनमध्ये राडा! दरवाजाजवळ उभे राहण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद; एकजण रेल्वेतून पडला खाली

गुरुवारी (६ नोव्हेंबर) रात्री सुमारे साडेदहा वाजता चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या जलद लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेदरम्यान, एक प्रवासी धावत्या ट्रेनमधून खाली पडला. परंतु ट्रेन मुंबई सेंट्रल स्टेशनवरून कमी वेगाने जात असल्याने सुदैवाने तो बचावला. मिळालेल्या वृत्तानुसार, ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रेनच्या दारात उभे राहण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. धावत्या लोकल ट्रेनमध्ये त्या दोन प्रवाशांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. या झटापटीदरम्यान, एक प्रवासी धावत्या डब्यातून खाली पडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे मुंबईच्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

आधी देखील घडल्या होत्या अशा घटना

मुंबईत मुसळधार पावसात डब्याचा दरवाजा उघडा ठेवण्यावरून झालेल्या वादाला जून महिन्याच्या सुरुवातीला एका लोकल ट्रेनमध्ये जीवघेणे वळण लागले, ज्यात एका २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. मयंक लोहार नावाचा तरुण चर्चगेट नालासोपारा जलद लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत होता. मुसळधार पावसात डब्याचा दरवाजा बंद ठेवावा की उघड ठेवावा यावरून त्याच दुसऱ्या एका प्रवाशासोबत जोरदार शाब्दिक वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन तरुणाला त्यात आपला जीव गमवावा लागला.

तसेच चर्चगेट नालासोपारा लोकल ट्रेनमधील एका २२ वर्षीय प्रवाशाच्या प्राणघातक हत्येनंतर काही दिवसांनी मुंबईत चाकू हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. अपघाताने झालेल्या धक्क्यातून सुरु झालेल्या किरकोळ वादानंतर माहीम रेल्वे स्टेशनजवळ एका ३५ वर्षीय व्यक्तीचा पाठलाग करून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडित व्यक्तीची ओळख नवीन प्रसन्ना अशी असून तो माहीममधील पितांबर लेनवरील कुरेशी महल कंपाउंडचा रहिवासो आहे आणि लोअर परेलमधील एका खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >