
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये या परीक्षा पार पडणार असून, बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली आहे. मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या महत्त्वाच्या तारखा
बारावी बोर्ड परीक्षा 8 फेब्रुवारी 2027 ते 18 मार्च 2027 पर्यंत असणार
दहावी बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी 2027 पासून ते 15 मार्च 2027 दरम्यान होणार
प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा
बारावी बोर्डाच्या परीक्षा 20 जानेवारी 2027 ते 6 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणार
तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 28 जानेवारी 2027 ते 13 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणार

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत होणार परीक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. या सर्व विभागांमध्ये लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत पार पडतील.
परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना विषयानुसार अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. तसेच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनाही परीक्षापूर्व तयारी, सराव परीक्षा आणि मार्गदर्शनाचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे. विद्यार्थ्यांनी विषयवार परीक्षेच्या तारखा आणि वेळा अधिकृत वेळापत्रकातून तपासून घ्याव्यात. परीक्षेसंदर्भातील अधिकृत सूचना आणि अद्ययावत माहितीसाठी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अधिकृत संकेतस्थळ: https://mahahsscboard.in/






