Ghatkopar Fire : घाटकोपर येथील इमारतीच्या 23 व्या मजल्यावर आग; 3 जण जखमी

अग्निशमन दलाने सुरुवातीला लेव्हल-1 आणि त्यानंतर लेव्हल-2 चा कॉल घोषित केला

घाटकोपर : मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील कुकरजा पॅलेस या उंच इमारतीच्या 23 व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. 6 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 8:08 वाजता ही आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. अग्निशमन दलाने सुरुवातीला लेव्हल-1 आणि त्यानंतर लेव्हल-2 चा कॉल घोषित केला. या घटनेत 3 जण जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.



आगीवर नियंत्रण, इमारत रिकामी


घाटकोपर पूर्वेतील पंतनगर परिसरातील वल्लभ बाग लेन येथे कुकरजा पॅलेस ही तळमजला अधिक 25 मजल्यांची निवासी इमारत आहे. या इमारतीच्या 23 व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.


मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. इमारतीत कोणी अडकले आहे का, याची खात्री करण्यासाठी शोधमोहीमही सुरू करण्यात आली.



तीन जण जखमी; प्रकृती स्थिर


या आगीत साईनाथ आवळे (45) हे 27 टक्के भाजले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.


दरम्यान, धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झालेल्या निरव लोढाया (34) आणि राजेश लोढाया (47) यांनाही झिनोव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.


आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

कुलाब्यातील शासकीय कार्यक्रमातून खासदार मिलिंद देवरांना डावलले; आयुक्त अश्विनी भिडेंना खरमरीत पत्र!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आश्रय योजनेतील लाभार्थ्यांच्या चावी

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत रक्तरंजित घटना, दोन बहि‍णींवर अंदाधुंद गोळीबार; गोळी एकीच्या कानाला तर दुसरीच्या...

नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 1 मध्ये दोन तरूणींवर

Mumbai News: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवरील 'या' 5 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद; कुणाला मिळणार सवलत?

मुंबई: पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेनेही प्रवाशांसंबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सण आणि छट

BDD Chawl: मूळ मुंबईकरांना मुंबईतच मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी वाटप

मुंबई: "मुंबईची संस्कृती जपणाऱ्यांना हक्काचं घर देण्याचं मोठं समाधान असून, मूळ मुंबईकरांना मुंबईतून कधीही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांकडून बीडीडीवासीयांना 557 कुटुंबीयांना घरांच्या चाव्यांचे वितरण!

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आज, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर

BMC Ashray Yojana: मुंबईचा खरा हिरो सफाई कर्मचारी; त्यांच्या हक्काच्या घरांसाठी सरकार कटिबद्ध ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबई: राज्यात सध्या दिवाळीचे आनंदमय वातावरण सुरु आहे. गोरगरीब जनतेपासून नोकरदार वर्गापर्यंत सगळेजण दिवाळी