Nashik : देवळाली कॅम्प येथे 13 नोव्हेंबर रोजी तोफखाना सराव, नाशिक व इगतपुरी तालुक्यातील काही गावांना सतर्कतेचा इशारा

Nashik : देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वतीने शुक्रवार १३ नोव्हेंबर २०२६ रोजी तोफखाना व मैदानी गोळीबाराची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. या सरावादरम्यान जीवंत दारुगोळ्याचा वापर करण्यात येणार असल्याने नाशिक व इगतपुरी तालुक्यातील काही गावांच्या महसुली हद्दीतील क्षेत्रे ‘धोकादायक क्षेत्र’ (Danger Zone) म्हणून अधिसूचित करण्यात आली आहेत. त्यामुळे या क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीने प्रवेश करू नये, कोणालाही जाऊ देऊ नये तसेच आपली पाळीव जनावरे त्या क्षेत्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, असे अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.



सराव केव्हा होणार ?


शुक्रवार १३ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्यालय तोफखाना, स्कूल ऑफ आर्टिलरी, देवळाली कॅम्प यांच्या नियोजनानुसार अधिसूचित ‘झेड’ (Z) सेक्टरमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत हा सराव होणार आहे.



या गावांचा आहे समावेश


नाशिक तालुक्यातील वंजारीवाडी, लहवीत रेल्वे स्टेशन आणि लोहशिंगवे. इगतपुरी तालुक्यातील घोटीची वाडी, घोटी खुर्द, नांदगाव, नांदूर वैद्य, साकूर, बेलगाव कुऱ्हे तसेच संबंधित अधिसूचनेत नमूद अन्य क्षेत्रांचा धोकादायक क्षेत्रात समावेश आहे.



नागरिकांना प्रशासनाचे आवाहन


या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत अधिसूचित धोकादायक क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीने प्रवेश करू नये. तसेच या परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत. आपल्या पाळीव जनावरांनाही या क्षेत्रात जाण्यापासून रोखावे. युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना सराव अधिनियम १९३८ मधील कलम १०(२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.



नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई


प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी प्रवेश केल्यास अथवा प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अधिसूचनेनुसार कलम १२ अंतर्गत दंडनीय कारवाईची तरतूद आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करून प्रवेश केल्यामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी शासनावर राहणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि तोफखाना सरावाच्या कालावधीत प्रतिबंधित क्षेत्रापासून दूर राहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्री. राजपूत यांनी केले आहे.

Comments
Add Comment

BMW Gift to Son: मुलाला नववीत चांगले गुण मिळाल्यामुळे वडिलांनी गिफ्ट म्हणून दिली आलिशान कार; किमंत ऐकून व्हाल चकित

BMW Gift to Son: मुंबईत एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लाईटमन म्हणून काम करणाऱ्या एका तांदूळ व्यापाऱ्याने आपल्या निववीत

BMC Diwali Bonus : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत दिवाळी बंपर

मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीपुढे यंदा ११२ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. ऐन

Vaijapur Crime News : 'मार मार मारलं, पाणी मागितलं अन् तोंडात...'; वैजापूर हत्या प्रकरणाने खळबळ; पालकमंत्र्यांची पीडित कुटुंबीयांना भेट

वैजापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून एक माणुसकीला कलंक फासणारी घटना समोर आली आहे.

वनडेतील नशीबवान फलंदाज! आकडेवारी पाहून बसेल आश्चर्याचा धक्का, गेल्या 3 वर्षांत कुणालाही जमलं नाही

क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला जीवदान मिळालं की त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न असतो. पण अशी संधी अनेकदा

Nashik : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नाशिकच्या MIDC परिसरात पोलिसांचा कडक पहारा ! सातपूर-अंबडमध्ये रात्रीची गस्त वाढणार

नाशिक : दिवाळीच्या सणानिमित्त 8 ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील अनेक औद्योगिक कारखाने सलग काही

Weather Update: दिवाळीतही मुंबईकरांना उकाड्याचा चटका! गुलाबी थंडीची प्रतीक्षा कायम

Weather Update: दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असली तरी अद्यापही मुंबईमध्ये गुलाबी थंडी पडलेली नाही. मुंबईत शनिवारी