Saturday, November 7, 2026

Thane Crime News : ठाण्यातून 10 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला अटक; ठाकुर्लीत 10 दिवसांपासून होता लपून

झारखंड पोलिसांनी त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Thane Crime News: महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) ठाणे जिल्ह्यातील ठाकुर्ली परिसरातून एका नक्षलवादी संघटनेच्या सदस्याला अटक केली आहे. संजय सरजू यादव उर्फ गोदारम यादव (वय 45) असे त्याचे नाव आहे. तो नक्षलवादी संघटनेच्या विभागीय समितीचा सदस्य असल्याची माहिती आहे. झारखंड पोलिसांनी त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

ठाकुर्लीत 10 दिवसांपासून लपून होता

मिळालेल्या माहितीनुसार, संजय यादव हा गेल्या 10 दिवसांपासून ठाकुर्ली परिसरात लपून बसला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला झारखंड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. झारखंड पोलिसांनी पुढील कारवाई करत त्याला अटक केली.

झारखंड पोलिसांकडून पुढील तपास

संजय यादव याच्यावर झारखंड पोलिसांनी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. नक्षलवादी संघटनेतील त्याची भूमिका आणि त्याच्याशी संबंधित प्रकरणांचा तपास झारखंड पोलीस करत आहेत. महाराष्ट्र एटीएसच्या या कारवाईमुळे झारखंड पोलिसांना तपासात मदत होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >