Saturday, November 7, 2026

वनडेतील नशीबवान फलंदाज! आकडेवारी पाहून बसेल आश्चर्याचा धक्का, गेल्या 3 वर्षांत कुणालाही जमलं नाही

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना आहे. या सामन्यात डॅरेल मिचेलला पुन्हा एकदा जीवदान मिळालं आणि त्याने 104 चेंडूत 55 धावांची खेळी केली. कदाचित हा डाव आधीच आटोपला असता.

क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला जीवदान मिळालं की त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न असतो. पण अशी संधी अनेकदा मिळाली तर.. असं डॅरेल मिचेलच्या बाबतीत घडलं आहे. गेल्या तीन चार वर्षातील आकडेवारी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे डॅरेल मिचेल हा वनडे क्रिकेटमधील सर्वात नशिबवान खेळाडू आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. याची प्रचिती पुन्हा एकदा आली. भारत न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना वेलिंग्टन येथे सुरू आहे. या सामन्यात डॅरेल मिचेलला एक नाही तर दोन जीवदान मिळाले. त्याचा डॅरेल मिचेलने पुरेपूर फायदा घेतला आहे. न्यूझीलंडच्या डावाच्या 17व्या षटकात 21 धावांवर असताना त्याला जीवदान मिळालं. अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने त्याचा सोपा झेल सोडला. त्याचा फायदा डॅरेल मिचेल उचलला. एका बाजूने धडाधड विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने त्याने किल्ला लढवला.

डॅरेल मिचेलला अशी मिळाली संधी

डॅरेल मिचेलने 104 चेंडूंचा सामने केला आणि 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. त्याने 52.88 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. खरं तर या खेळपट्टीवर तग धरणं कठीण होतं. त्याच्या या झुंजार खेळीमुळे थोडा का होईना न्यूझीलंडचा डाव सावरला. न्यूझीलंडने 41 षटकात सर्व गडी गमवून 134 धावा केल्या. तसेच विजयासाठी 135 धावांचं आव्हान दिलं आहे. यात 55 धावा या एकट्या डॅरेल मिचेलच्या आहेत. त्यामुळे उर्वरित संघ 79 धावा करू शकला. यात मिचेल सँटनरने 31 धावांची खेळी केली.

डॅरेल मिचेल असा ठरला नशिबवान

जानेवारी 2023 पासून आतापर्यंत डॅरेल मिचेलला नशिबाची जोरदार साथ मिळाली आहे. कारण त्याचा झेल सोडण्याची ही पहिली दुसरी नाही तर 18वी वेळ आहे. या कालावधीत डॅरेल मिचेल इतकं जीवदान कोणत्याच फलंदाजाला मिळालेलं नाही, हे विशेष.. जानेवारी 2023 पासून आतापर्यंत जेव्हा कधी डॅरेल मिचेलचा झेल गेला तेव्हा टक्केवारीचा हिशेब काढला तर 64 टक्के झेल बाद झाला. म्हणजेच उर्वरित 36 टक्क्यात त्याला जीवदान मिळालं आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >