Saturday, November 7, 2026

Diwali Shubh Muhurat: एकाच दिवशी दोन सण! अभ्यंगस्नान आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय?

दिवाळीच्या पवित्र सणात लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. जाणून घ्या, यंदा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि पूजेसाठी कोणती वेळ उत्तम मानली जाते.

1/5 दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. यंदा म्हणजेच 2026 मध्ये 8 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी साजरे केले जाणार आहे. त्यामुळे पहाटे अभ्यंगस्नानापासून ते संध्याकाळच्या लक्ष्मीपूजनापर्यंत भाविकांसाठी हा दिवस विशेष असणार आहे. (Photo: AI) 2/5 8 नोव्हेंबरलाच नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन का?
हिंदू पंचांगानुसार, कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजून 47 मिनिटांनी सुरू होऊन 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजून 27 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानंतर अमावस्या तिथी सुरू होईल. नरक चतुर्दशीचे अभ्यंगस्नान सूर्योदयापूर्वी केले जाते. यंदा 8 नोव्हेंबर रोजी पहाटे चतुर्दशी तिथी असल्याने नरक चतुर्दशीचे अभ्यंगस्नान याच दिवशी केले जाणार आहे. तर संध्याकाळी अमावस्या तिथी असल्यामुळे लक्ष्मीपूजनही 8 नोव्हेंबर रोजीच होणार आहे. (Photo : AI) 3/5 लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त
दिवाळीच्या अमावस्येला माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची पूजा केली जाते. घरात सुख, समृद्धी, धनधान्य आणि भरभराट नांदावी, अशी प्रार्थना केली जाते. 8 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे. प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. (Photo: AI) 4/5 नरक चतुर्दशीचे धार्मिक महत्त्व
पौराणिक कथेनुसार, नरकासुर नावाच्या राक्षसाने अनेकांना त्रास दिला होता. त्याच्या अत्याचारांपासून लोकांची मुक्तता करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. या विजयाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून दिवाळीच्या आनंदाला सुरुवात केली जाते. घराबाहेर दिवे लावण्याचीही परंपरा आहे. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हटले जाते. (Photo: AI) 5/5 लक्ष्मीपूजनाचे धार्मिक महत्त्व
हिंदू धर्मात लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. माता लक्ष्मीला धन, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी मानले जाते. दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री घर स्वच्छ करून रांगोळी काढली जाते आणि दिव्यांची रोषणाई केली जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची विधिवत पूजा केली जाते. घरात सुख-शांती, आर्थिक समृद्धी आणि कुटुंबाचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना केली जाते.(Photo: AI)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >