Kanpur Hit & Run Case: थार गाडीची स्कूटर चालवणाऱ्या तरुणाला धडक; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेश येथील कानपूरमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका थार कारने स्कूटर चालवणाऱ्या एका तरुणाला धडक दिली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला शनिवारी रात्री ही घटना घडली असून, थार कारमधील दोन तरुणींनी गाडी सोडून पळ काढला आहे. अपघात इतका भीषण होता की, स्कूटर चालवणारा तरुण रस्त्यावरून फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

Kanpur Hit & Run Case: उत्तर प्रदेश येथील कानपूरमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका थार कारने स्कूटर चालवणाऱ्या एका तरुणाला धडक दिली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला शनिवारी रात्री ही घटना घडली असून, थार कारमधील दोन तरुणींनी गाडी सोडून पळ काढला आहे. अपघात इतका भीषण होता की, स्कूटर चालवणारा तरुण रस्त्यावरून फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा अपघात कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवास विकास चौकीजवळ घडला असून यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे, थार कारवर 'कृष्णा ग्रुप' लिहिले आहे. गाडी चालवताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थार गाडीने रस्त्यावरील अनेक लोकांना धडक दिली आणि त्यानंतर स्कूटरस्वार संतोष सिंग चौहान यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.



पोलीस तपास
यासंदर्भात, मृताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आला असून गुन्हा दाखल केला जात आहे. त्यामुळे याबदल पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, मृताची ओळख पांकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी संतोष कुमार सिंग अशी पटली असून थारच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे, पोलिसांनी वाहन मालक आणि फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले जात आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अपघातात सामील असलेल्या थार गाडीची ओळख पटली आहे. शिवाय, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा तपास सुरू आहे.





समोर आलेल्या माहितीनुसार, एसयूव्ही भरधाव वेगात होती आणि स्कूटरला धडक दिल्यानंतर ती सुमारे 25 ते 30 मीटरपर्यंत फरफटत नेली आणि अखेरीस एका रेलिंगवर जाऊन आदळली. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाच्या सर्व पैलूंची तपासणी करत असून, वाहनातून प्रवास करणाऱ्या महिलांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम करत आहेत.

Comments
Add Comment

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशातील प्रमुख नेत्यांकडून दीपावलीच्या शुभेच्छा; सुख-समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना

नवी दिल्ली : दीपावलीच्या पवित्र सणानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन,

Faridabad Crime: धक्कादायक! पार्किंग आणि कुत्र्याच्या वादातून गोळीबार, माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू

पार्किंग आणि कुत्र्याच्या विष्ठेवरून सुरू असलेला वाद शुक्रवारी रात्री रक्तरंजित ठरला. शेजाऱ्याने केलेल्या

Indian Army Fact Check: चीनने अरुणाचल प्रदेशात 50 किमी भूमी बळकावली? नेमकं सत्य काय?

चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना पराभूत करून अरुणाचल प्रदेशात सुमारे ५० किलोमीटरचा परिसर ताब्यात घेतल्याच्या

कर्करोगविरोधी औषधांच्या किमतीत मोठी कपात! 9 नोव्हेंबरपासून नवे दर लागू; रुग्णांची वर्षाला ₹3,502 कोटींची बचत

नवी दिल्ली : कर्करोगाच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी; बागडोगरा हवाई दल स्थानकावर सैनिकांना मिठाई वाटप

सिलिगुडी : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी बागडोगरा हवाई दल स्थानकाला भेट देत भारतीय हवाई दलाच्या

'अयोध्येत या, पण आधी माफी मागा', मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अखिलेश सिंह यादव यांच्यावर हल्लाबोल

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे. समाजवादी पार्टी नेते अखिलेश