बोरिवली-कांदिवलीकरांचा प्रवास होणार आरामदायी! BEST ची नवी वातानुकूलित बससेवा सुरू

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने सोमवारी (09 नोव्हेंबर) बोरिवली रेल्वे स्टेशन पासून एक नवीन वातानुकूलित वर्तुळाकार बस मार्ग सुरु केला आहे.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने सोमवारी (09 नोव्हेंबर) बोरिवली रेल्वे स्टेशन पासून एक नवीन वातानुकूलित वर्तुळाकार बस मार्ग सुरु केला आहे. हा मार्ग बोरिवली आणि कांदिवली परिसरातील प्रमुख निवासी भागांना जोडेल. ए-636 हा मार्ग गौतम नगर, अनिता नगर आणि अलिका नगर यांसारख्या महत्त्वाच्या निवासी भागांमधून जाईल, त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल. या मार्गावर येणाऱ्या इतर प्रमुख ठिकाणांमध्ये समता नगर, ओंकारेश्वर मंदिर आणि ठाकूर कॉलेजचा समावेश आहे.


ए - 636 मार्गाचे वेळापत्रक


बेस्ट उपक्रमाने प्रभाग 27 च्या नगरसेविका नीलम गुरव यांना पाठवलेल्या पत्रानुसार ए-636 बस दररोज 17 ते 20 मिनिटांच्या अंतराने धावे. पहिली बस बोरिवली स्टेशन (पूर्व) येथून सकाळी 6.40 वाजता सुटेल आणि शेवटची बस रात्री 10 वाजता सुटेल, असे बेस्ट उपक्रमाने सांगितले. दाट लोकवस्तीच्या निवासी भागांमधील कनेक्टिव्हीटीमधील उणीव भरून काढण्याच्या आणि खाजगी वाहतुकीला एक आरामदायी पर्याय उपलत करून देण्याच्या उद्देशाने हा नवीन वातानुकूलित मार्ग सुरु करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याचे एका वृत्तसंस्थेने सांगितले आहे.



बोरीवली स्थानक (पूर्व) आणि क्रांती नगर दरम्यान गौतम नगर, अनिता नगर व अलिका नगर मार्ग नवीन वातानुकूलित बसमार्ग क्र ए-636 सोमवार, दि.09 नोव्हेंबर 2026 पासून कार्यान्वित करण्यात आला आहे. सदर वर्तुळाकार बसमार्गाचा प्रवासमार्ग बोरीवली स्थानक (पूर्व) बोरीवली रेल्वे कंपाऊंड मार्ग - महात्मा गांधी मार्ग, ओंकारेश्वर मंदीर, सर अलियावर जंग महामार्ग, समता नगर जंक्शन, समतानगर, ठाकुर महाविद्यालय, 120 फुट मार्ग, आकुर्ली मार्ग, गौतम नगर, अलिका नगर, क्रांती नगर, आकुर्ली मार्ग, 120 फुट मार्ग, ठाकुर महाविद्यालय समतानगर, समता नगर जंक्शन, सर अलियावर जंग महामार्ग, ओंकारेश्वर मंदीर -कार्टर मार्ग बोरीवली स्थानक (पूर्व) असा आहे. हा मार्ग संपूर्ण आठवडा कार्यान्वित असून या बसमार्गावर 17 ते 20 मिनीटांच्या वेळेने बसगाड्या प्रवर्तित करण्यात येतील.

Comments
Add Comment

Prabhadevi Station Bridge: प्रभादेवी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज; फलाटावर ये-जा करण्यासाठी पूल खुला

मुंबई : प्रभादेवी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी फलाटावर जा-ये

Mumbai Fire : मुंबई आणखी एक भीषण घटना; अंधेरीतील हंस वल्लभ इमारतीच्या 7 व्या मजल्यावरील घराला आग

Mumbai Fire News: अंधेरी पश्चिम येथील राम मंदिर रोडवरील हंस वल्लभ इमारतीच्या 7 व्या मजल्यावरील एका घराला आग लागल्याची घटना 9

Dongri Fire: डोंगरीतील नूर बाग परिसरात मध्यरात्री भीषण आग, दुकाने आणि काही झोपड्यांचे मोठे नुकसान

मुंबई : मुंबईत 8 नोव्हेंबरच्या रात्री डोंगरी आणि अंधेरी पूर्व परिसरात गॅरेजला आग लागल्याच्या दोन घटना घडल्या. या

GMLR प्रकल्पांतर्गत 'विहार' टनेल बोरिंग मशीनद्वारे दुसऱ्या भूमिगत बोगद्याचे खोदकाम सुरू, संपूर्ण प्रोजेक्टची वाचा अपडेट

मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा 3 (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) जमिनीखालून

शहाडचा रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कायमची फुटणार, कल्याण- मुरबाड- उल्हासनगरचा प्रवास सुसाट; मेगा प्रोजेक्टला मंजुरी

कल्याण: कल्याणवरून मुरबाड आणि उल्हासनगरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी

Farmers Visit: आदिवासी पाड्यात चिमुकल्यांना भेटवस्तू देत मंत्री मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी

Mumbai:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला मध्यनजर ठेऊन राज्यातील मंत्री दुष्काळग्रस्त भागात