Prabhadevi Station Bridge: प्रभादेवी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज; फलाटावर ये-जा करण्यासाठी पूल खुला

प्रभादेवी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी फलाटावर जा-ये करण्यासाठी होणारी प्रवाशांची कोंडी आता काही प्रमाणात कमी होणार आहे. स्थानकाच्या दक्षिण दिशेकडील पादचारी पुलावर पश्चिम बाजूला उभारण्यात आलेला अतिरिक्त जिना प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.

मुंबई : प्रभादेवी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी फलाटावर जा-ये करण्यासाठी होणारी प्रवाशांची कोंडी आता काही प्रमाणात कमी होणार आहे. स्थानकाच्या दक्षिण दिशेकडील पादचारी पुलावर पश्चिम बाजूला उभारण्यात आलेला अतिरिक्त जिना प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. या जिन्याचे बांधकाम महापालिकेचे जुने स्वच्छतागृह काढल्यानंतर अवघ्या 80 दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना फलाटावर ये-जा करण्यासाठी मार्ग उपलब्ध झाला आहे.


स्थानकाच्या दक्षिण दिशेकडील पादचारी पुलावर पश्चिम बाजूला जिना नसल्याने स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय वाढली होती. त्यामुळे उपलब्ध असलेल्या मर्यादित मार्गावर अवलंबून राहावे लागत होते. साहजिकच, गर्दीच्या वेळेत या मार्गावर मोठी गर्दी होत असल्याने फलाटावर उतरताना आणि स्थानकाबाहेर पडताना प्रवाशांना रेटारेटीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर दक्षिण दिशेकडील पादचारी पुलावर अतिरिक्त जिना उभारण्याची मागणी करण्यात आली होती. या गैरसोयींमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.



महापालिकेचे जुने स्वच्छतागृह जिना उभारण्याच्या जागेतून हटवण्यात आले. त्यानंतर 80 दिवसांत हे बांधकाम पूर्ण करून जिना प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. मात्र, या कामादरम्यान रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बांधकामाच्या एका बाजूला रस्ता, तर दुसऱ्या बाजूला रेल्वे रूळ असल्याने कामासाठी मर्यादित जागा उपलब्ध होती. तसेच यंत्रसामग्री आणि बांधकाम साहित्याची ने-आण तसेच साठवणूक करताना विशेष नियोजन करावे लागले. स्थानक परिसरात निवासी इमारती असल्याने रात्रीच्या वेळी बांधकाम करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे दिवसा उपलब्ध असलेल्या मर्यादित वेळेतच काम पूर्ण करावे लागत होते. दरम्यान, मुंबई महापालिकेकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली. पादचारी पुलाचे काम पूर्ण होऊन तो नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे आता या जिन्यावरून प्रवास करणे प्रवाश्यांसाठी अधिक सुखकर होणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Fire : मुंबई आणखी एक भीषण घटना; अंधेरीतील हंस वल्लभ इमारतीच्या 7 व्या मजल्यावरील घराला आग

Mumbai Fire News: अंधेरी पश्चिम येथील राम मंदिर रोडवरील हंस वल्लभ इमारतीच्या 7 व्या मजल्यावरील एका घराला आग लागल्याची घटना 9

Dongri Fire: डोंगरीतील नूर बाग परिसरात मध्यरात्री भीषण आग, दुकाने आणि काही झोपड्यांचे मोठे नुकसान

मुंबई : मुंबईत 8 नोव्हेंबरच्या रात्री डोंगरी आणि अंधेरी पूर्व परिसरात गॅरेजला आग लागल्याच्या दोन घटना घडल्या. या

GMLR प्रकल्पांतर्गत 'विहार' टनेल बोरिंग मशीनद्वारे दुसऱ्या भूमिगत बोगद्याचे खोदकाम सुरू, संपूर्ण प्रोजेक्टची वाचा अपडेट

मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा 3 (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) जमिनीखालून

शहाडचा रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी कायमची फुटणार, कल्याण- मुरबाड- उल्हासनगरचा प्रवास सुसाट; मेगा प्रोजेक्टला मंजुरी

कल्याण: कल्याणवरून मुरबाड आणि उल्हासनगरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी

Farmers Visit: आदिवासी पाड्यात चिमुकल्यांना भेटवस्तू देत मंत्री मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी

Mumbai:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला मध्यनजर ठेऊन राज्यातील मंत्री दुष्काळग्रस्त भागात

कस्टम अधिकारी बनून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लुटणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश; मुंबईत 3 जण गजाआड!

मुंबई: परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांना गाठून, बनावट ओळखपत्रांच्या आधारे त्यांची लुटमार करणाऱ्या एका