Monday, November 9, 2026

Best phones launching in 2026: नवीन फोन खरेदीचा विचार करताय? 2026 मध्ये भारतात दाखल होणार ‘हे’ खास स्मार्टफोन

2026 हे वर्ष संपायला आता अवघे काही आठवडे शिल्लक आहेत. मात्र, स्मार्टफोन कंपन्यांकडून नवीन फोन लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. Vivo, Xiaomi, Oppo, iQOO आणि OnePlus यांसारख्या ब्रँडचे नवे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे. दमदार प्रोसेसर, शानदार कॅमेरा, मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंगसारखी खास वैशिष्ट्ये या फोनमध्ये पाहायला मिळू शकतात. जाणून घेऊया या आगामी स्मार्टफोनबद्दल.

2026 हे वर्ष संपायला आता अवघे काही आठवडे शिल्लक आहेत. मात्र, स्मार्टफोनप्रेमींसाठी वर्षाचा शेवट खास ठरण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अनेक स्मार्टफोन कंपन्या आपले नवीन फोन भारतीय बाजारपेठेत दाखल करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये Vivo, Xiaomi, OPPO आणि OnePlus यांसारख्या लोकप्रिय कंपन्यांच्या फोनचा समावेश आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सेल कॅमेरा, मोठी बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि दमदार प्रोसेसर यांसारखी वैशिष्ट्ये मिळण्याची शक्यता आहे. (Upcoming smartphones 2026 India)

1. Vivo X500 Series

Vivo ची X500 सीरिज सध्या चर्चेत आहे. या सीरिजमध्ये Vivo X500, Vivo X500 Pro आणि Vivo X500 Pro Max असे तीन मॉडेल्स येण्याची शक्यता आहे. कंपनीने भारतात ही सीरिज लॉन्च होणार असल्याचे संकेत दिले आहेत. नोव्हेंबरच्या अखेरीस या फोनचे लॉन्चिंग होऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये Zeiss कॅमेरा तंत्रज्ञान मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः Pro Max मॉडेलमध्ये 200MP पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा मिळू शकतो. यामुळे दूरच्या वस्तूंचे फोटो अधिक चांगल्या प्रकारे टिपता येऊ शकतात. याशिवाय 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि मोठी बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.

2. Xiaomi 18 Pro

Xiaomi चा Xiaomi 18 Pro हा आणखी एक चर्चेत असलेला स्मार्टफोन आहे. कंपनीने या फोनच्या भारतातील आगमनाचे संकेत दिले आहेत. मात्र, लॉन्चची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 6 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन 200MP रिअर कॅमेरे असू शकतात. तसेच फोनच्या मागील बाजूस अतिरिक्त AMOLED डिस्प्ले मिळण्याची चर्चा आहे. 7,000mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंगसारखी वैशिष्ट्येही अपेक्षित आहेत.(Latest phone technology)

3. OPPO Reno 17 Series

OPPO ची Reno सीरिज कॅमेरा आणि डिझाइनसाठी ओळखली जाते. आता कंपनी Reno 17 सीरिज सादर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये Reno 17, Reno 17c आणि Reno 17 Pro या मॉडेल्सचा समावेश असण्याची शक्यता आहे. या सीरिजमध्ये 1.5K OLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. तसेच 7,000 ते 8,000mAh क्षमतेची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग दिले जाण्याची चर्चा आहे. फोटोग्राफीसाठी 50MP चे तीन रिअर कॅमेरे मिळण्याची शक्यता आहे. ही सीरिज भारतात डिसेंबरमध्ये दाखल होऊ शकते. मात्र, कंपनीने भारतातील लॉन्चची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

4. OnePlus 16

OnePlus चा OnePlus 16 हा देखील चर्चेतील आगामी स्मार्टफोन आहे. हा फोन चीनमध्ये लॉन्च झाला असून भारतीय बाजारपेठेत त्याच्या उपलब्धतेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. या फोनमध्ये 6.78 इंच AMOLED डिस्प्ले आणि 185Hz रिफ्रेश रेट मिळतो. यामध्ये Snapdragon 8 Elite Extreme Gen 6 प्रोसेसर आणि 9,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी 200MP मुख्य कॅमेरा मिळतो. भारतात हा फोन डिसेंबर 2026 किंवा जानेवारी 2027 मध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Top smartphone brands India)

5. iQOO 16

iQOO कंपनीचा iQOO 16 हा देखील वर्षअखेरीस चर्चेत असलेला फोन आहे. हा स्मार्टफोन डिसेंबरमध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite Extreme Gen 6 प्रोसेसर मिळू शकतो. याशिवाय 2K रिझोल्यूशन असलेला 165Hz डिस्प्ले आणि 8,400mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून या फोनच्या भारतातील लॉन्चची अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही.

स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा

2026 च्या शेवटच्या दोन महिन्यांत स्मार्टफोन बाजारपेठेत अनेक नवीन पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कॅमेरा, बॅटरी आणि प्रोसेसरमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. मात्र, यापैकी अनेक स्मार्टफोनची लॉन्च तारीख, किंमत आणि संपूर्ण फीचर्स अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर संबंधित कंपन्यांच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.(New phone features)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >