1/5
Diwali beauty tips : दिवाळीच्या धावपळीत घराची सजावट, खरेदी आणि फराळाची तयारी करताना स्वतःच्या त्वचेकडे लक्ष द्यायला अनेकांना वेळ मिळत नाही. त्यामुळे फेशियल किंवा क्लीनअप करायचे राहून जाते. तुम्हालाही पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळाला नसेल, तर घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही पदार्थांपासून फेसपॅक तयार करू शकता. कच्चे दूध, तांदळाचे पीठ आणि ज्येष्ठमध पावडर वापरून तयार होणारा हा फेसपॅक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जाणून घेऊया तो कसा तयार करायचा आणि वापरताना कोणती काळजी घ्यायची.
2/5
फेसपॅक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
2 चमचे कच्चे दूध, 1 चमचा तांदळाचे पीठ, अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर, अर्धा चमचा मध, गरजेनुसार गुलाबपाणी 3/5
फेसपॅक कसा तयार करायचा?
सर्वप्रथम एका स्वच्छ भांड्यात कच्चे दूध घ्या. त्यामध्ये तांदळाचे पीठ आणि ज्येष्ठमध पावडर घालून व्यवस्थित मिसळा. त्यानंतर त्यात थोडा मध घालून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करा. आवश्यकतेनुसार गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट फार पातळ किंवा घट्ट नसावी. अशा प्रकारे तुमचा घरगुती फेसपॅक तयार होईल. 4/5
फेसपॅक चेहऱ्यावर कसा लावायचा?
फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर तयार केलेली पेस्ट चेहरा आणि मानेवर हलक्या हाताने लावा. साधारण 15 ते 20 मिनिटे ती राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. शेवटी त्वचेला अनुकूल असलेले मॉइश्चरायझर लावा. तांदळाच्या पिठाचा थर काढताना चेहरा जोरात घासू नका. 5/5
फेसपॅक वापरण्यापूर्वी ही काळजी घ्या- घरगुती पदार्थांपासून तयार केलेला फेसपॅक प्रत्येकाच्या त्वचेला अनुकूल असेलच असे नाही. कच्चे दूध, मध किंवा ज्येष्ठमधामुळे काही व्यक्तींना ॲलर्जी अथवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हाताच्या आतील बाजूला किंवा कोपराजवळ थोडे मिश्रण लावून पॅच टेस्ट करा. खाज, लालसरपणा किंवा जळजळ जाणवल्यास त्याचा वापर करू नका. महत्त्वाचे: हा घरगुती फेसपॅक फेशियल किंवा क्लीनअपचा पर्याय नाही. त्वचेवर आधीपासून पुरळ, जखम, ॲलर्जी किंवा जळजळ असल्यास तो वापरणे टाळा. त्वचेच्या समस्या कायम असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Diwali beauty tips : दिवाळीच्या धावपळीत घराची सजावट, खरेदी आणि फराळाची तयारी करताना स्वतःच्या त्वचेकडे लक्ष द्यायला अनेकांना वेळ मिळत नाही. त्यामुळे फेशियल किंवा क्लीनअप करायचे राहून जाते. तुम्हालाही पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळाला नसेल, तर घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही पदार्थांपासून फेसपॅक तयार करू शकता. कच्चे दूध, तांदळाचे पीठ आणि ज्येष्ठमध पावडर वापरून तयार होणारा हा फेसपॅक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जाणून घेऊया तो कसा तयार करायचा आणि वापरताना कोणती काळजी घ्यायची.
2/5
फेसपॅक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य2 चमचे कच्चे दूध, 1 चमचा तांदळाचे पीठ, अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर, अर्धा चमचा मध, गरजेनुसार गुलाबपाणी 3/5
फेसपॅक कसा तयार करायचा?सर्वप्रथम एका स्वच्छ भांड्यात कच्चे दूध घ्या. त्यामध्ये तांदळाचे पीठ आणि ज्येष्ठमध पावडर घालून व्यवस्थित मिसळा. त्यानंतर त्यात थोडा मध घालून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करा. आवश्यकतेनुसार गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट फार पातळ किंवा घट्ट नसावी. अशा प्रकारे तुमचा घरगुती फेसपॅक तयार होईल. 4/5
फेसपॅक चेहऱ्यावर कसा लावायचा?फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर तयार केलेली पेस्ट चेहरा आणि मानेवर हलक्या हाताने लावा. साधारण 15 ते 20 मिनिटे ती राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. शेवटी त्वचेला अनुकूल असलेले मॉइश्चरायझर लावा. तांदळाच्या पिठाचा थर काढताना चेहरा जोरात घासू नका. 5/5