Airtel 299 plan: एअरटेल ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 299 रुपयांचा प्लॅन परतला, डेटा मात्र घटला

जर तुम्ही एअरटेल सिम वापरत असाल आणि दरमहा सुमारे ३०० रुपयांचा रिचार्ज करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने आपला जुना २९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन पुन्हा सुरु केला आहे. एअरटेलने सुमारे तीन महिन्यांपूर्वी हा प्लॅन बंद केला होता. यानंतर ग्राहकांकडे २८ दिवसांच्या वैधतेचा डेली डेटा प्लॅन मिळवण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. आता कंपनीने २९९ रुपयांचा प्लॅन परत आणला आहे, पण त्यात एक बदल केला आहे. पूर्वी तुम्हाला दररोज १.५ GB डेटा मिळायचा आता फक्त १GB डेटा मिळेल.


हा बदल अशावेळी आला आहे जेव्हा एअरटेलच्या मोबाईल ग्राहकसंख्येची वाढ मंदावली आहे आणि नेटवर्क सोडून जाणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे २९९ रुपयांचा प्लॅन परत आणण्याचा निर्णय हा ग्राहकांना टिकवून ठेवण्याचा एक प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. एअरटेलचा पुन्हा सुरु झालेला २९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येतो यामध्ये दररोज १ जीबी हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. यापूर्वी याच किमतीत दररोज १.५ GB डेटा मिळत होता. याचा अर्थ आता तुम्हाला पूर्वीच्या प्लॅनच्या तुलनेत दररोज ५०० MB कमी डेटा मिळेल.



जे वापरकर्ते दररोज व्हिडिओ पाहतात, सोशल मीडिया वापरतात किंवा मोबाईल इंटरनेटवर बराच वेळ घालवतात, त्यांच्यावर याचा थेट परिणाम होईल. जर तुमचा दैनंदिन डेटा वापर १GB पेक्षा जास्त होत असेल तर तुम्हाला अतिरिक्त डेटा पॅक खरेदी करावा लागेल किंवा जास्त किंवा जास्त किमतीचा रिचार्ज निवडावा लागेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पूर्वीच्या २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दिला जाणारा १.५ GB चा दैनिक डेटा परत आलेला नाही.


तीन महिन्यांपूर्वी २९९ रुपयांची योजना का बंद करण्यात आली?


एअरटेलने ऑगस्ट २०२६ मध्ये आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमती आणि लाभांमध्ये सुधारणा केली. या कालावधीत कंपनीने २९९, ३१९, ५७९, ६१९ आणि ६४९ किमतीचे प्लॅन्स बंद केले. या प्लॅन्समध्ये दररोज १.५ GB डेटा आणि अमर्याद कॉलिंगसारखे फायदे मिळत होते. २९९ रुपयांचा प्लॅन बंद झाल्यानंतर २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज डेटा शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ३४९ रुपयांचा प्लॅन एक लोकप्रिय पर्याय बनला. यामध्ये दररोज १.५ GB डेटा आणि अमर्याद ५G ॲक्सेस मिळत होता. या बदलामुळे जे वापरकर्ते पूर्वी २९९ रुपये खर्च करत होते त्यांना आता त्याच दैनंदिन डेटा लाभासाठी ३४९ रुपये खर्च करावे लागणार होते. याचा अर्थ रिचार्जच्या खर्चात अंदाजे १६.७ टक्क्यांनी वाढ होणार होती. कंपनीच्या या धोरणाचा उद्देश प्रति ग्राहक महसूल वाढवणे हा होता.

Comments
Add Comment

Nashik : आंघोळीसाठी धरणात उतरले अन् काळाने गाठले, वडिलांसह दोन मुलींचा दुर्दैवी अंत

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या अंजनेरी शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली

Ranveer Sinh Grandfather: रणवीर सिंगच्या आजोबांचे निधन; बहीण सौम्याने शेअर केली भावूक पोस्ट

Ranveer Sinh: दिवाळीनिमित्त सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या घरी दुःखद घटना घडली आहे.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार विक्रांत पाटील यांनी पाच लाखांचा मदतनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला सुपूर्द

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना मदतीचा हात

भारतीय संघाबाहेर गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने अखेर मौन सोडले; मनातील खदखद व्यक्त करत म्हणाला...

भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृ्त्वात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला गवसणी घातली. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाची

Kulgam Terrorist Attack: मोठी बातमी! जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सीआरपीएफ चौकीवर दहशतवादी हल्ला; दोन जवान जखमी

Kulgam Terrorist Attack:  जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्

शेतकरी संकटात असताना कर्ज वसुलीसाठी तगादा नको! फायनान्स कंपन्यांना कृषीमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : “शेतकरी शेतातच उध्वस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या आर्थिक अडचणींचा विचार करून फायनान्स कंपन्यांनी वाहने