एअरटेल ब्रॉडबँड नेटवर्कने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी निवडक प्रीपेड वापरकर्त्यांना Buy 1 Get 1 Free रिचार्ज ऑफर देत आहे. या योजनेअंतर्गत जर तुम्ही ३४९ रुपयांचा किंवा ३९९ रुपयांचा रिचार्ज केला तर तुम्हाला त्याच किमतीचा दुसरा रिचार्ज मोफत मिळेल. याचा अर्थ तुम्ही एकाच पेमेंटमध्ये अंदाजे ५६ दिवसांपर्यंत मोबाईल सेवांचा आनंद घेऊ शकता. या ऑफरचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये केवळ कॉलिंग आणि डेटाच नाही तर काही अतिरिक्त फायदेदेखील समाविष्ट आहेत. तथापि एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे की ही ऑफर प्रत्येक एअरटेल ग्राहकासाठी उपलब्ध नाही. सध्या ती केवळ निवडक वापरकर्त्यांसाठी एअरटेल थँक्स ॲपमध्ये दिसत आहे. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरवर ऑफरची उपलब्धता तपासणे महत्त्वाचे आहे.
एअरटेलच्या ३४९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची स्टँडर्ड वैधता २८ दिवसांची आहे. यामध्ये दररोज २ जीबी हाय स्पीड ४जी डेटा मिळतो. याव्यतिरिक्त एअरटेलच्या 5G नेटवर्कने व्यापलेल्या भागांमध्ये पात्र ५जी फोन वापरणाऱ्या ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाचाही लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. यामध्ये १२ महिन्यांचे adobe एक्सप्रेस प्रिमिअम सब्स्क्रिप्शन, मोफत हॅलोट्यून्स आणि एअरटेल सेट यांसारख्या लाभांचाही समावेश आहे. एअरटेल सेफमध्ये ओटीपी स्कॅमपासून संरक्षण करण्यासाठी स्पॅम कॉल अलर्ट, फसव्या लिंक ब्लॉक करणे आणि एआय आधारित अलर्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
एअरटेलचा ३९९ रुपयांचा प्लॅन जास्त डेटाची गरज असलेल्या वापरकर्त्यांसाठी आहे. यामध्ये २८ दिवसांची स्टँडर्ड वैधता देखील मिळते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि आणि एसटीडी कॉलिंग तसेच दररोज १०० एसएमएसचा समावेश आहे. या प्लानचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा. यामध्ये 1 GB आणि 2 GB सारखी कोणतीही निश्चित दैनिक डेटा मर्यादा नाही. याचा अर्थ वापरकर्त्यांना दररोज डेटा संपण्याची चिंता करण्याची गरज नाही. या प्लॅनमध्ये १२ महिन्यांच्या Adobe Express Premium Subscription चादेखील समावेश आहे. जर तुमच्या नंबरवर Buy 1 Get 1 Free ऑफर उपलब्ध असेल तर तुम्ही ३९९ रुपयांच्या रिचार्जसोबत दुसरा ३९९ रुपयांचा रिचार्ज मोफत मिळवू शकता. यामुळे एकूण वैधता ५६ दिवसांची होते.
ही ऑफर कशी मिळवायची?
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये एअरटेल थँक्स ॲप उघडा. त्यानंतर प्रीपेड रिचार्ज सेक्शनमध्ये जाऊन ३४९ किंवा ३९९ चा प्लॅन शोधा. जर तुमच्या नंबरवर ऑफर उपलब्ध असेल तर प्लॅनसोबत '1+1 रिचार्ज फ्री' किंवा 'Buy 1 Get 1 Free' असा टॅग दिसू शकतो. टॅग दिसत असेल तरच रिचार्ज करा. जर हा टॅग दिसत नसेल तर ऑफर तुमच्या नंबरवर सध्या उपलब्ध नाही.