
Prahaar Marathi News Live Updates: मंत्रालयाच्या कँटीनमध्ये मिळणार शेगावची कचोरी, पुणेरी मिसळ
मंत्रालय आणि विधानभवनातील कँटीनमधील खाद्यपदार्थांच्या दर्जात सुधारणा करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना पौष्टिक आणि संतुलित आहार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यानुसार या दोन्ही कँटीनमध्ये शेगावची कचोरी, पुणेरी मिसळ यांसारख्या प्रादेशिक खाद्यपदार्थांसह बीट कबाब, दलिया उपमा, मंचाव सूप, उकडलेला मका आणि हराभरा कबाब अशा सुमारे ५४ नव्या पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. तेलकट आणि आरोग्यास अपायकारक पदार्थांवरील अवलंबित्व कमी करून कर्मचाऱ्यांना चव आणि पोषण यांचा समतोल साधणारे पर्याय उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
Prahaar Marathi News Live Updates: मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण? हार्दिक पांड्याला सोडलं आणि अर्शदीप सिंगला घेतलं
आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठा करार झाला आहे. या करारानुसार हार्दिक पांड्या पंजाब किंग्सकडून, तर अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. त्यामुळे आता कर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न आहे.






