Nashik News: अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने ट्रे घेतला अन् चोरट्यांनी पळ काढला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

नाशिकच्या सराफ दुकानातील चोरीची घटना सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. एका सराफ दुकानामध्ये दोन चोरट्यांनी अंगठ्यांनी भरलेला ट्रे घेऊन पसार झाले आहेत.

नाशिक: नाशिकमधील एका सराफ दुकानातील चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या धक्कादायक घटनेची सध्या नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सध्या दिवाळी सणानिमित्त ज्वेलर्स शॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर गिर्‍हाईकांची लगबग असते. शॉपिंगचं निमित्त साधत एका गिऱ्हाईकाने दुकानातील दागिन्यांवर डल्ला मारला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चोरट्यांनी सोन्याचे दागिने घेण्याचा बहाणा करत दुकानातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. दागिन्यांनी भरलेला ट्रे घेऊन पळ काढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.



व्हायरल व्हिडिओ नाशिकमधला असल्याचं बोललं जात आहे. पण नेमक्या कोणत्या परिसरातील हा व्हिडिओ आहे, हे समजू शकलेलं नाही. एका ज्वेलरी शॉपमधील दागिन्यांच्या चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हायरल व्हिडिओनुसार, अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या चोरांनी अवघ्या काही सेकंदांत अंगठ्यांनी भरलेला ट्रे घेऊन पळ काढला. चोरीची ही संपूर्ण घटना दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ग्राहक बनून आलेल्या चोरांनी इतक्या सहजपणे चोरी कशी केली? संपूर्ण घटना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकणार आहेत. अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून ज्वेलर्समालकांना केले जात आहे.


 


मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी डल्ला मारलेली अंगठी ही तब्बल 2.5 तोळ्याची होती. चोरट्यांनी अंगठ्यांचा ट्रे घेऊन दुकानाच्या बाहेर धुम ठोकल्यानंतर दुकान मालकासह कर्मचाऱ्यांनीही चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपींनी गाडीतून धुम ठोकल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरीच्या प्रकरणी सराफ दुकानदाराने पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली आहे. गुन्हा नोंदवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. सोने खरेदीच्या बहाण्याने सोन्याच्या अंगठ्यांनी भरलेला ट्रे लांबवल्यामुळे परिसरातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या हा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


Comments
Add Comment

Prahaar Marathi News Live, 11 November 2026 : महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Prahaar Marathi News Live दिनांक 11 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,

रत्नागिरीत दिवाळीच्या तोंडावर महालक्ष्मी मिनी मॉल खाक; कोटींचे नुकसान

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील अतिशय वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मारुती मंदिर परिसरातील के. सी.

NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण आमच्याशिवाय होणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; समान नागरी कायदा आणण्यावर सरकार ठाम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणावरून राज्यात पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीची चाहूल! किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट; पुढील काही दिवस हवामान कोरडे

Weather News: महाराष्ट्रात हळूहळू थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने

Gokul Milk Union : गोकुळच्या संदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या बाजूने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका; राहुल गांधींवरही टीका

मुंबई : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानामुळे महायुतीने सत्ता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुष्काळग्रस्तांसाठी मोठी घोषणा, मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि शिक्षणाची हमी

मुंबई: दिवाळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या