Wednesday, November 11, 2026

Marathi Entertainment News: 13 वर्षांनंतर पुन्हा जमणार ललित-प्राजक्ताची जोडी! नव्या चित्रपटातील सीन लीक?

तब्बल 13  वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा त्यांच्या आगामी शुभ मंगलम जोडी दंगलम या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या वेळी दोघेही मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

Marathi Entertainment News: मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली ह्या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य केले. मालिकेतील आदित्य आणि मेघना या पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आजही या जोडीची क्रेझ कायम आहे. दोघांनी पुन्हा एकत्र काम करावे. अशी चाहत्यांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. अखेर चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तब्बल 13  वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा त्यांच्या आगामी शुभ मंगलम जोडी दंगलम या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या वेळी दोघेही मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.

ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांच्या 'शुभ मंगलम जोडी दंगलम' या चित्रपटाची पहिली झलक काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. आता या सिनेमाच्या सेटवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. राजस्थानमधील पुष्कर येथे चित्रित करण्यात आलेल्या एका सीनचा हा व्हिडीओ असल्याचं दिसत आहे आणि हा विडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमणात व्हायरल होत आहे.

लीक झालेला व्हिडिओमध्ये राजस्थानमधील एका रस्त्यावर चित्रपटाची संपूर्ण टीम शूटिंग करताना दिसत आहे. एका दुकानाबाहेर ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी उभे असल्याचे पाहायला मिळते. यानंतर अचानक ललित एका चोराच्या मागे धावताना दिसत आहे. तो त्या चोराला पकडतो असा सीन पाहून हिरोईनला तो वाचवण्यासाठी धावत असल्याचे अंदाज बांधले जात आहे. मात्र, या सीनमागचं नेमकं कथानक अद्याप समोर आलेले नाही. काही दिवसांआधी प्राजक्ताने पुष्करला फिरायला गेल्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या व्हिडीओमध्ये ललित लाल रंगाच्या ट्रान्सपरंट शर्टमध्ये दिसत आहे. तर प्राजक्ता माळीनेही लाल रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघांचा हा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा ते दोघे चर्चेत आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >