आसाममध्ये रेल्वे अपघात! कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचे इंजिनसह ६ डबे रुळावरून घसरले; सर्व प्रवासी सुरक्षित

आसाममधील दिगारू रेल्वे स्थानकाजवळ कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. बुधवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बुधवारी (११ नोव्हेंबर) सकाळी गुवाहाटीजवळील दिगारू रेल्वे स्थानकावर मिझोरमला जाणाऱ्या कोलकाता सैरंग एक्सप्रेसचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. मिझोरम ते कोलकाता हा नेहमीच प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा प्रवास धक्कादायक ठरला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा ट्रेन कोलकाताहून मिझोरममधील सैरंगकडे जात होती. नॉर्थइस्ट फ्रंटियर रेल्वेचे (NFR) मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) के. के. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ६ वाजून ५४ मिनिटांनी आसाममधील दिगारू रेल्वे स्थानकावर दुसऱ्या गाडीला प्राधान्य देण्यासाठी गाडी क्रमांक १३१२५ कोलकाता - सैरंग एक्सप्रेस थांबवली जात असताना लोको पायलटला वेग नियंत्रित करता आला नाही. यामुळे गाडी रुळावरून खाली घसरण्याची दुर्घटना घडली. यामध्ये इंजिनसह सहा डबे रुळावरून घसरले.


सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही. प्रवाशांना पर्यायी ट्रेनने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले जात आहे, अशी माहिती देखील शर्मा यांनी दिली. घटनेनंतर तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले. एनएफआरचे महाव्यवस्थापक, इतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसह कार्याची देखरेख करण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.





नुकसान झालेला रेल्वेमार्ग मोकळा करून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पथकेही काम करत होती. गाडी रुळावरून घसरल्यामुळे या मार्गावरील सेवा विस्कळीत होऊ शकतात. कोलकाता सैरंग एक्सप्रेस ही मिझोरम आणि पूर्व भारत यांच्यातील एक महत्त्वाची रेल्वे जोडणी आहे. या सेवेमुळे मिझोरमची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारते आणि हे राज्य ईशान्य भारताबाहेरील प्रमुख ठिकाणांशी जोडले होते.

Comments
Add Comment

रशिया-युक्रेन युद्धाचा तिढा सुटणार? पंतप्रधान मोदींच्या एका फोन कॉलने उडाली खळबळ, जगात मोठी चर्चा!

रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. यातच भारताचे

कर्करोगविरोधी 1,364 औषधांच्या सुधारित एमआरपी लागू; ग्राहकांची वर्षाला ₹3,540 कोटींची बचत

नवी दिल्ली : कर्करोगाच्या रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या 'स्वच्छ सर्वेक्षण 2025-26' पुरस्कारांची घोषणा; देशातील स्वच्छ शहरांचा होणार गौरव

नवी दिल्ली: देशभरातील शहरांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा आणि जनजागृती वाढवणाऱ्या 'स्वच्छ सर्वेक्षण'च्या 10 व्या

उत्तराखंडच्या विकासाची झेप! मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते ‘सशक्त नेतृत्व, विकास की ऊँची उड़ान’ पुस्तिकेचे प्रकाशन

[caption id="attachment_1073883" align="aligncenter" width="800"] उत्तराखंड राज्य स्थापना दिनानिमित्त देहरादून येथील गोरखा मिलिट्री इंटर कॉलेज, गढी

Kolkata Crime: कोलकात्यात लिव्ह-इन पार्टनरची हत्या; 25 वर्षीय IT व्यावसायिकाचा मृत्यू, प्रेयसी आणि आईला अटक

कोलकात्यातील २५ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. कोलकाता येथे लिव्ह इनमध्ये राहणारे जोडपे

Iran US War Warning : इराणचा अमेरिकेला थेट अल्टिमेटम : 'युद्ध थांबवा, नाहीतर ४८ तासांत...

वॉशिंग्टन : अमेरिका (America) आणि इराणमधील (Iran) भू-राजकीय संघर्ष आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे. इराणचे