Wednesday, November 11, 2026

आयसीसी वनडे क्रमवारीत टीम इंडियाचाच डंका; शुभमन गिल अव्वल स्थानी, तर रोहित-विराटमध्ये जोरदार चुरस!

आयसीसीने अद्ययावत वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत शुभमन गिलच्या रेटिंगचं नुकसान झालं आहे. मात्र त्याचं अव्वल स्थान कायम आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात क्रमवारीत चुरस आहे.

1/5 आयसीसीने आठवड्याभरानंतर वनडे क्रमवारी अपडेट केली आहे. या क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. भारताच्या तीन फलंदाजांनी टॉप 5 मध्ये जागा मिळवली आहे. भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिल या यादीत अव्वल स्थानी कायम आहे. (Photo: ANI) 2/5 टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल 822 च्या रेटिंगसह अव्वल स्थानी कायम आहे. पण त्याचे रेटिंग मागील रेटिंगपेक्षा कमी झाले आहे. त्याचे मागील रेटिंग 841 होते. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गिल शून्यावर बाद झाल्यामुळे त्याचे रेटिंग कमी झाले आहे. (Photo: ANI) 3/5 शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन वनडे सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे त्याला याचा फटका बसू शकतो. पण न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल 794 च्या रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Photo: ANI) 4/5 रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील लढत सुरूच आहे. सध्या, विराट कोहली 781 रेटिंगसह आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्मा 754 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. (Photo: ANI) 5/5 श्रेयस अय्यरला क्रमवारीत थोडे नुकसान झाले आहे. श्रेयस अय्यर 608 रेटिंगसह 18 व्या क्रमांकावर घसरला आहे. शुभमन गिलच्या गैरहजेरीत श्रेयस अय्यर उर्वरित दोन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करेल. श्रेयस अय्यर फलंदाजीच्या क्रमात थोडा वरच्या स्थानावर खेळू शकतो, ज्यामुळे त्याला मोठी खेळी करण्याची संधी मिळेल. (Photo: ANI)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >