
Bhaubeej 2026: दिवाळीतील शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची कामना करतात. मात्र, या दिवशी औक्षण करण्यासोबतच भावाला नारळ देण्याची परंपराही पाळली जाते. पण ही प्रथा नेमकी आहे तरी काय? आणि त्यामागे कोणती धार्मिक मान्यता आहे, तुम्हाला माहीत आहे का?
भाऊबीजचा सण हा बंधुप्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळून त्याच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर भावाला मिठाई भरवतात आणि अनेक ठिकाणी बहिणी भावाला नारळदेखील देतात.
यामागील कारण म्हणजे, भाऊबीज पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात नारळाला शुभता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. धार्मिक विधींपासून ते शुभ कार्यांच्या प्रारंभापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपण नारळाचा वापर हमखास करतो. भाऊबीजच्या दिवशी भावाला नारळ देण्याची प्रथा देखील याच परंपरेशी जोडलेली आहे.
Train Window Grill: भारतीय रेल्वेतून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. ट्रेनने प्रवास करताना आपण नेहमी खिडकीजवळ बसून बाहेरचे दृश्य पाहत असतो. एक गोष्ट तुम्ही कधी ...
नारळ देण्यामागील श्रद्धा धार्मिक परंपरेनुसार, नारळ हे देवाचे आवडते फळ मानले जाते. याला श्रीफळ असेही म्हणतात. कोणत्याही शुभ प्रसंगी आपण नारळ अर्पण करून शुभकामाला सुरवात करतो. असे मानले जाते की, यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होण्यास मदत होते. तर भाऊबीजच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना नारळ देतात. हे त्यांच्या दीर्घायुष्याच्या आणि सुखाच्या इच्छेशी निगडित आहे. असा म्हणतात की नारळ देऊन बहिणी आपल्या भावाच्या उत्तम आरोग्यासाठी, सुखासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करतात. तसेच, नारळ भावाला वाईट नजर आणि नकारात्मकतेपासून वाचवतात. एका आख्यायिकेनुसार, या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्याकडे आले होते. यमुनेने त्यांचे स्वागत केले, त्यांना टिळा लावला आणि भोजन दिले. बहिणीच्या प्रेमावर प्रसन्न होऊन यमराजांनी तिला एक वरदान दिले. तेव्हापासून, भाऊबीजच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना टिळा लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात. नारळ देऊन, बहीण आपल्या भावाच्या उत्तम आरोग्यासाठी, प्रगतीसाठी आणि आनंदासाठी शुभेच्छा देते. अशा प्रकारे, टिळा आणि नारळ भाऊ-बहिणीच्या नात्याला अधिकच खास बनवतात. (Disclaimer: या बातमीतील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)





