Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा विशेष सन्मान; न्यूयॉर्कमधील 'व्हेटरन्स डे' परेडच्या ग्रँड मार्शल म्हणून नेतृत्व

न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनच्या फिफ्थ अव्हेन्यूवर पार पडलेल्या या परेडमध्ये सुमारे 20,000 लोक सहभागी झाले होते.

Sunita Williams : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना अमेरिकेतील 'व्हेटरन्स डे' परेडमध्ये 'ग्रँड मार्शल' म्हणून सन्मानित करण्यात आले. माजी सैनिकांच्या सेवा आणि त्यागाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या परेडचे नेतृत्व त्यांनी केले. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनच्या फिफ्थ अव्हेन्यूवर पार पडलेल्या या परेडमध्ये सुमारे 20,000 लोक सहभागी झाले होते.



'ग्रँड मार्शल' बनणे हा मोठा सन्मान


निवृत्त नौदल कॅप्टन असलेल्या सुनीता विल्यम्स यांनी हा सन्मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ग्रँड मार्शल बनण हा आपल्यासाठी अत्यंत मोठा सन्मान असल्याचे त्या म्हणाल्या. नौदलातील सेवेमुळेच आपल्याला घडण्यास आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.


प्रत्येक पिढीतील माजी सैनिकांच्या सेवा, त्याग आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी न्यूयॉर्कसह संपूर्ण अमेरिकेतील नागरिकांसोबत सहभागी होताना अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले.



608 दिवस अंतराळात वास्तव्य


नासामध्ये सहभागी होण्यापूर्वी सुनीता विल्यम्स चाचणी वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी तीन अंतराळ मोहिमांमध्ये एकूण 608 दिवस अंतराळात घालवले आहेत. तसेच एका महिला अंतराळवीराने केलेल्या सर्वाधिक 9 स्पेसवॉकचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. या स्पेसवॉकदरम्यान त्यांनी

">एकूण 62 तास अंतराळात घालवले.



107 वी वार्षिक परेड; हजारो माजी सैनिकांचा सहभाग


ही अमेरिकेतील 107 वी वार्षिक 'व्हेटरन्स डे' परेड होती. यामध्ये हजारो माजी सैनिकांसह सशस्त्र दलांचे जवान, स्थानिक कायदा अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी, विविध सामुदायिक गट आणि शाळांच्या तुकड्यांनी सहभाग घेतला. अनेक बँड आणि कंपन्यांचे चित्ररथही परेडचे आकर्षण ठरले.


परेडच्या एक दिवस आधी सुनीता विल्यम्स यांनी 'यूएसएस सॅन अँटोनियो' या नौदलाच्या जहाजावर आयोजित समारंभाला हजेरी लावली. या कार्यक्रमात मरीन कॉर्प्सच्या स्थापनेचा 251 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.



स्टारलाइनर मोहिमेमुळे जगभरात चर्चा


सुनीता विल्यम्स या न्यूरोॲनाटॉमिस्ट दीपक पंड्या आणि स्लोव्हेनियन वंशाच्या उर्सुलिन पंड्या यांच्या कन्या आहेत. 2024 मध्ये बोईंग स्टारलाइनर अंतराळयानातून त्या आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते. ही मोहीम सुरुवातीला आठ दिवसांची नियोजित होती. मात्र, स्टारलाइनरमधील तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे वास्तव्य वाढले आणि त्यांना जवळपास 9 महिने अंतराळ स्थानकावर राहावे लागले. या मोहिमेमुळे सुनीता विल्यम्स जगभरात चर्चेत आल्या होत्या.


 स्टारलाईनर मोहिमेमुळे जगभरात चर्चा सुनीता विल्यम्स या न्यूरोअॅनाटॉमिस्ट दीपक पंड्या आणि स्लोव्हेनियन वंशाच्या उर्सुलिन पंड्या यांच्या कन्या आहे.

Tags
nasaSunita WilliamsUS NewsSpace NewsVeterans Day ParadeGrand Marshal
Comments
Add Comment

ब्रुकलिनमध्ये इमारतीचा भाग कोसळला, 2 ठार, 17 जखमी, एकजण अजूनही ढिगाऱ्याखाली

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन भागात बुधवारी दुपारी एका तीन मजली इमारतीचा भाग कोसळल्याची मोठी दुर्घटना

फारसच्या आखातात दुबईकडे जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय खलाशासह चौघे गंभीर जखमी!

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद

रशिया-युक्रेन युद्धाला पूर्णविराम मिळणार? अबू धाबीतील गुप्त त्रिपक्षीय चर्चेने उडाली खळबळ

अबू धाबी: संपूर्ण जगाचे लक्ष सध्या संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) केंद्रित झाले असून, गेल्या चार वर्षांपासून जगाला

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन तेलवाहू जहाजांवर भीषण हल्ले; आखातात युद्धाचे ढग दाटले!

तेहरान: मध्यपूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत खळबळजनक, धक्कादायक आणि युद्धाची

कोरोनाचा नवा व्हेरिएंट PJ.2.1; पुन्हा येणार कोविडची लाट? भारताला किती धोका?

वर्ष 2019-20 मध्ये कोरोना विषाणूने जवळपास संपूर्ण जगाला चिंतातूर करून सोडलं होतं. आता कोरोना विषाणूचा आणखी एक प्रकार

व्हाईट हाऊसमध्ये राडा! डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या AI व्हिडिओने उडवली खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक डिजिटल