भारतीय संघाबाहेर गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने अखेर मौन सोडले; मनातील खदखद व्यक्त करत म्हणाला...
भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव संघात जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला संघातून बाहेर काढण्यात आलं. तसेच श्रेयस अय्यरकडे जबाबदारी सोपवण्यात आली. या प्रकरणावर सूर्यकुमार यादवने पाच महिन्यानंतर मौन सोडले आहे.
November 11, 2026 03:20 PM
भारतीय संघाबाहेर गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने अखेर मौन सोडले; मनातील खदखद व्यक्त करत म्हणाला... (Photo: ANI)
भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृ्त्वात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला गवसणी घातली. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाची बरीच प्रशंसा झाली. असं असताना टी20 संघाची धुरा त्याच्याकडेच असेल असं क्रीडाप्रेमींना वाटलं होतं. पण तसं झालं नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर त्याला कर्णधारपद गमवावं लागलं. तसेच नेतृत्व श्रेयस अय्यरच्या खांद्यावर टाकलं गेलं. खरं तर जेतेपद मिळवल्यानंतर असं तडकाफडकी त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळे सूर्यकुमार यादवसाठी हा मोठा धक्का होता. पण या घडामोडीनंतर सूर्यकुमार यादव व्यक्त झाला नव्हता. आता पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर सूर्यकुमार यादवने मौन सोडलं आहे. सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडत सांगितलं की, सुरुवातीचे दोन महिने खूपच कठीण होते.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
मुंबईत टी20 मुंबई लीगच्या 'सेलिब्रेशन ऑफ चॅम्पियन्स' कार्यक्रमात बोलताना सूर्यकुमार यादवने आपलं मन मोकळं केलं. सूर्यकुमार यादव म्हणाला की, "टी20 विश्वचषक जिंकल्यानंतरचा काळ थोडा कठीण होता. मला हे सत्य स्वीकारायला संकोच वाटत नाही. जर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक नसाल, तर आनंदी जीवन जगणे कठीण आहे." सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, यावर्षी मे महिन्यात झालेल्या त्याच्या मुलीच्या जन्माने त्याला या मानसिक गोंधळातून बाहेर पडण्यास मदत केली. सूर्यकुमार यादव याने सांगितलं की, "खरं सांगायचं तर, संघाबाहेर असणं माझ्यासाठी खूप कठीण होतं, पण आयपीएल दरम्यान मे महिन्यात माझ्या मुलीचा जन्म झाला. त्यानंतर माझं संपूर्ण लक्ष तिच्यावर केंद्रित झालं. तिच्या जन्मानंतरचे हे काही महिने माझ्यासाठी खूप सुंदर आहेत."
[caption id="attachment_1074142" align="aligncenter" width="800"] आयसीसीने आठवड्याभरानंतर वनडे क्रमवारी अपडेट केली आहे. या क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. भारताच्या ...
सूर्यकुमार यादव याने या धक्क्यानंतर स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमार यादव म्हणाला की, "संघातून वगळल्यानंतरचे पहिले दोन महिने माझ्यासाठी खूप कठीण होते. त्यानंतर मला माझे जुने दिवस आठवू लागले." सूर्यकुमार म्हणाला की, "मी विचार केला, माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला जसा विचार करायचो, तसाच विचार पुन्हा का करू नये? माझ्या क्रिकेट प्रवासाच्या सुरुवातीला, मुंबईच्या वयोगट क्रिकेट संघात खेळणे आणि नंतर प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणे, हेच माझे एकमेव स्वप्न होते."
सूर्यकुमार मनातलं सांगत म्हणाला की "मी या सर्व गोष्टींचा विचार केला आणि माझ्या पत्नीशी बोलू लागलो. माझ्या मनात जे होते, तेच तीही म्हणाली. तिचा विश्वास होता की, वयाच्या 15व्या वर्षी माझ्यात जी आवड होती, ती मला पुन्हा जागृत करायला हवी. त्यावेळी, मुंबईच्या 15 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करणे, हेच माझे एकमेव स्वप्न होते."