
Maharashtra News: दिवाळीनंतर सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक जिल्ह्यात CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) ही दरवाढ जाहीर केली आहे. CNG च्या दरात प्रतिकिलो 1 रुपये 25 पैसे, तर घरगुती PNG च्या दरात प्रति SCM 1 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. 12 आणि 13 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.
मुंबई : अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरात एलपीजी सिलिंडरच्या मुख्य व्हॉल्व्हमधून आगीचा भडका उडाल्याची घटना गुरुवारी (12 नोव्हेंबर) रात्री घडली. या आगीत ...
CNG चा दर 99.75 रुपये प्रतिकिलो
MNGL च्या दरवाढीनंतर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक परिसरात CNG चा नवा दर 99 रुपये 75 पैसे प्रतिकिलो झाला आहे. यापूर्वीच्या दरात 1 रुपये 25 पैशांची वाढ करण्यात आली आहे.
घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस अर्थात PNG च्या दरातही वाढ झाली आहे. PNG च्या दरात प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर (SCM) 1 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता घरगुती PNG चा नवा दर 51 रुपये 75 पैसे प्रति SCM झाला आहे.
सप्टेंबरनंतर पुन्हा दरवाढ
सप्टेंबर महिन्यातही CNG आणि PNG च्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी CNG प्रतिकिलो 2 रुपयांनी, तर घरगुती PNG प्रति SCM 1 रुपयाने महागला होता. त्यानंतर आता पुन्हा दरवाढ झाल्याने वाहनचालक आणि घरगुती गॅस ग्राहकांच्या खर्चात वाढ होणार आहे.
देशात CNG ची मागणी वाढली असून ही गरज भागवण्यासाठी अतिरिक्त गॅसचा साठा मागवण्यात आल्याचा परिणाम दरवाढीवर झाल्याचे सांगितले जात आहे. आखाती देशांमधील ऊर्जा क्षेत्रातील परिस्थितीचाही दरांवर परिणाम होत असल्याचे वृत्त आहे.
रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागणार?
CNG च्या दरवाढीचा परिणाम रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या खर्चावर होऊ शकतो. त्यामुळे मुंबई, ठाणे, पनवेल आणि वसई-विरार परिसरात प्रवासाच्या दरांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रवासभाड्यात वाढ होणार की नाही, हे संबंधित निर्णयांवर अवलंबून असेल.






