
Mumbai Bomb Threat: मुंबईसह पुण्यातदेखील बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल आला आहे. मुंबईमध्ये महापौरांच्या कार्यालयाचा उल्लेख करण्यात आला असून, विमानतळ, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बंगला जलसा, मुंबईतील बँक, कोर्ट,महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका मेलमधून देण्यात आली आहे. महानगर पालिकेचा उल्लेख असल्याने पालिकेत सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत. तपासणी पूर्ण केल्यानंतर शेवटी अद्यापत तरी काहीही संशयास्पद आढळलं नाही.
मुंबईमध्ये आलेल्या धमकीने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महापौर कार्यालय बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी दिली जात होती. ही धमकी देणारा मेल वारंवार येत आहे. त्यानंतर आता पुण्यातही धमकीचा मेल आला आहे. गुरुवार, 12 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 1:16 वाजता पुणे महापालिकेच्या ई-मेल आयडीवर धमकीचा संदेश पाठवण्यात आला. यामध्ये दुपारी ३:११ वाजता महापालिका मुख्यालय आणि महापौर कार्यालयात स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. या ईमेलमध्ये पुणे महापालिकेसोबतच पुणे विमानतळ, अमिताभ बच्चन यांचे जलसा निवासस्थान, आणि गायक दिलजीत दोसांझ यांच्या आगामी कॉन्सर्टला लक्ष्य करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कियारा अडवाणी अभिनेता यशसोबत केलेल्या इंटिमेट सीनमुळे प्रचंड ट्रोल ...
तर मुंबई येथे आलेल्या मेलमध्ये धक्कादायकरित्या आता एक दोन नव्हे तर तब्बल 5 ठिकाणांना लक्ष्य केलं जाणार असल्याचं सांगितले आहे. यामध्ये मुंबईचे महापौर यांचे कार्यालय मुंबईतील बँक, कोर्ट, अमिताभ बच्चन बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स, छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ ही महत्त्वाची ठिकाणी बॉम्बस्फोटने उडवून देऊ असा हा धमकीचा मेल आला आहे. आजचा हा मेल सकाळी 10.12 मिनिटांनी प्राप्त झाला आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत.
महापौर कार्यलयात सुरक्षा यंत्रणा ही तैनात करण्यात आली आहे. तसेच ताबडतोब बॉम्ब नाशक पथकाकडून तपासणी करण्यात आली. मेलमध्ये खलिस्तान बोलेगा मुंबई जिंदाबाद असा मजकुर लिहण्यात आला आहे. त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणा, मुंबई महापालिका कार्यालयातील चौकशी, तपासणी करण्यासाठी अलर्टवर आहे. हा धमकीचा मेल नेमका कुठून आला आहे त्यावर मुंबई पोलिस यांचा तपास सुरु आहे.






