Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी! शिवरायांची ऐतिहासिक वाघनखे आजपासून मुंबईत; ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ प्रदर्शनाचा चौथा टप्पा सुरू

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यभर विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले. याच उपक्रमाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट (V&A) संग्रहालयातून शिवरायांशी संबंधित ऐतिहासिक वाघनखे भारतात आणण्याचा यशस्वी करार करण्यात आला.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे आणि मराठा साम्राज्याच्या शौर्यपरंपरेची साक्ष देणारा दुर्मिळ शस्त्रखजिना पाहण्याची मोठी संधी आता मुंबईकरांना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने आयोजित ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या आंतरराष्ट्रीय शस्त्रप्रदर्शनाचा चौथा आणि अंतिम टप्पा आज (शुक्रवार, १३ नोव्हेंबर) मुंबईत सुरू होत आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते सायंकाळी ४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात या प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन होणार आहे.



लंडनमधून आणलेल्या वाघनखांचा प्रवास आणि प्रकल्पाचा उद्देश


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यभर विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले. याच उपक्रमाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट (V&A) संग्रहालयातून शिवरायांशी संबंधित ऐतिहासिक वाघनखे भारतात आणण्याचा यशस्वी करार करण्यात आला. १६ व्या ते १८ व्या शतकातील मराठा योद्ध्यांचा पराक्रम, त्यांची युद्धपरंपरा आणि शस्त्रकला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ हे भव्य प्रदर्शन साकारण्यात आले आहे.



सातारा, नागपूर आणि कोल्हापूरनंतर आता मुंबईत अंतिम पर्व


या शस्त्रप्रदर्शनाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी सातारा (४ जुलै २०२४ ते ३ फेब्रुवारी २०२५), नागपूर (७ फेब्रुवारी ते २ ऑक्टोबर २०२५) आणि कोल्हापूर (३ ऑक्टोबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२६) येथे या प्रदर्शनाचे पहिले तीन टप्पे यशस्वीरीत्या पार पडले. या तिन्ही शहरांतील इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि संशोधकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता या प्रदर्शनाचा चौथा आणि अंतिम टप्पा राजधानी मुंबईत भरवला जात आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या द्विभाषिक शस्त्रसूचींमुळे अभ्यासकांना मोठा संदर्भ उपलब्ध झाला आहे.



‘अटक ते कटक’ मराठा साम्राज्याचा इतिहास उलगडणार


मुंबईतील या अंतिम टप्प्यासाठी ‘अटक ते कटक’ ही विशेष संकल्पना निवडण्यात आली आहे. शिवरायांनंतर मराठा सेनानींनी स्वराज्याचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात केला. अटकेपार झेंडे रोवणारे रघुनाथराव पेशवे आणि कटकपर्यंत मराठा साम्राज्य नेणारे सेनासाहेबसुभा रघुजी भोसले यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी शस्त्रे हे या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.



प्रदर्शनात काय पाहायला मिळणार ?



  • छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक वाघनखे, रघुनाथराव पेशवे यांची फिरंगी तलवार, रघुजी भोसले यांची तलवार, खंडेराव गायकवाड यांची ढाल आणि सरदार रास्ते घराण्यातील पट्टा ही ऐतिहासिक शस्त्रे मुंबईकरांना पहिल्यांदाच एकाच छताखाली पाहता येणार आहेत.

  • अग्निबाण, इटा, पट्टा आणि काटेरी माडू यांसारखी विविध शासकीय संग्रहालयांतील दुर्मिळ शस्त्रे येथे मांडण्यात आली आहेत.

  • छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन चित्र, सोन्याचे 'होन' नाणे आणि विजयदुर्ग किल्ल्याचा अस्सल ऐतिहासिक नकाशा देखील या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. मराठा साम्राज्याचा हा गौरवशाली आणि वीररसपूर्ण इतिहास जवळून अनुभवण्यासाठी मुंबईकर नागरिक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन प्रदर्शनाचे संकल्पनाकार तथा पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

KEM Hospital : केईएम रुग्णालयातील लिफ्ट बंद, स्थायी समिती बैठकीत उमटले तीव्र पडसाद

मुंबई( विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील लिफ्ट बंद पडल्यामुळे रुग्णाला घसरत घसरत उतरावे

BMC : महापालिका स्थायी समितीत सोनियाचा दिवस, विधीमंडळाच्या धर्तीवर महापालिका सभागृहाचे बांधकाम, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात नगरसेवकांना बसण्यास जागा कमी पडत असल्याने आता

Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलाच्या कामगिरीचे स्थायी समितीत कौतुक, एवढ्या आगी तरीही शर्थीने केला प्रयत्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत ऐन दिवाळीमध्ये आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ हाेवून यामध्ये विशेषत:

Bomb Threat : खळबळजनक! मुंबईतील 6 बँकांना बॉम्बने उडवण्याची धमकी; 6 ठिकाणी एकाच वेळी ई-मेल

मुंबई : मुंबई महापालिकेला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर आता शहरातील विविध बँकांनाही लक्ष्य करण्यात आले

Mumbai Accident News : मुंबई कोस्टल रोडवर 5 ते 6 वाहनांची धडक; महिंद्रा एसयूव्हीला आग, काही जण किरकोळ जखमी

Mumbai Accident News:  मुंबईतील कोस्टल रोडवर गुरुवारी रात्री उशिरा 5 ते 6 वाहनांचा अपघात झाला. या अपघातात एका महिंद्रा

अंधेरीत एलपीजी सिलिंडरच्या व्हॉल्व्हमधून आगीचा भडका; आई-मुलगी गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील चकाला परिसरात एलपीजी सिलिंडरच्या मुख्य व्हॉल्व्हमधून आगीचा भडका उडाल्याची घटना