
वीकेंड आला की अनेकांना एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे मनोरंजनासाठी नेमकं काय पाहावं? काही जण मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करतात, तर काहींना घरी बसून एखादा चांगला चित्रपट पाहायला आवडतो. मात्र, OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपटांची एवढी मोठी यादी असते की, नेमका कोणता चित्रपट पाहायचा हे ठरवण्यातच बराच वेळ निघून जातो.
तुमचाही वीकेंड खास बनवायचा असेल आणि तुम्हाला पौराणिक कथांवर आधारित चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर ही यादी तुमच्यासाठी खास आहे. सध्या 'रामायण'मुळे प्रेक्षकांमध्ये पौराणिक चित्रपटांची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही तुमच्यासाठी अशा 5 दमदार मायथॉलॉजिकल चित्रपटांची माहिती घेऊन आलो आहोत, जे तुम्ही OTT वर घरबसल्या पाहू शकता. विशेष म्हणजे यातील काही चित्रपट हिंदी डब व्हर्जनमध्येही उपलब्ध आहेत.
1. महावतार नरसिंह (2025)
दिग्दर्शक: अश्विन कुमार
आवाजातील कलाकार: आदित्य राज शर्मा, हरिप्रिया मट्टा, हरजीत वालिया, प्रियंका भंडारी
OTT प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स
IMDb रेटिंग: 8.5/10
या यादीतील पहिल्या क्रमांकावर आहे 'महावतार नरसिंह'. होम्बले फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा भव्य अॅनिमेटेड पौराणिक चित्रपट भगवान विष्णू यांच्या वराह आणि नरसिंह अवतारांची कथा सांगतो. चित्रपटात असुरराज हिरण्यकश्यपूचा अहंकार, त्याचा पुत्र प्रल्हाद याची भगवान विष्णूंवरील अढळ श्रद्धा आणि अखेरीस नरसिंह अवतारात झालेला भगवंतांचा प्रकटाव या घटना प्रभावीपणे दाखवण्यात आल्या आहेत. पौराणिक कथेला भव्य व्हिज्युअल्स आणि दमदार क्लायमॅक्सची जोड मिळाल्याने हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरतो.
2. अर्जुन : द वॉरियर प्रिन्स (2012)
दिग्दर्शक: अर्नब चौधरी
आवाजातील कलाकार: युद्धवीर बकोलिया, अशोक बांठिया, विजय कश्यप, रवी खानविलकर
OTT प्लॅटफॉर्म: अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
IMDb रेटिंग: 6.8/10
महाभारतातील महान धनुर्धर अर्जुन याच्या जीवनावर आधारित 'अर्जुन : द वॉरियर प्रिन्स' हा एक उत्तम अॅनिमेटेड पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटात अर्जुनचे बालपण, हस्तिनापूरमधील प्रशिक्षण, गुरु द्रोणाचार्य यांच्याकडून मिळालेले शिक्षण आणि द्रौपदी स्वयंवर यांसारखे महत्त्वाचे प्रसंग पाहायला मिळतात. याशिवाय महाभारताच्या युद्धापूर्वी अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला धर्मसंकटही चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. महाभारताची कथा वेगळ्या पद्धतीने अनुभवायची असेल, तर हा चित्रपट नक्की पाहा.
Maatrubhumi: बॉलिवूडचा सुपरस्टार भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात घडलेल्या भारत-चीन ...
3. कुरुक्षेत्र (2019)
दिग्दर्शक: नागन्ना
कलाकार: दर्शन थुगुदीप, अंबरीश, व्ही. रविचंद्रन, अर्जुन सरजा, सोनू सूद
OTT प्लॅटफॉर्म: झी5 / अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
IMDb रेटिंग: 6.6/10
महाभारतावर आधारित भव्य चित्रपट पाहण्याची इच्छा असेल, तर 'कुरुक्षेत्र' हा चांगला पर्याय ठरू शकतो. कन्नड भाषेतील या चित्रपटाचे हिंदी डब व्हर्जनही उपलब्ध आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे महाभारताची कथा कौरवांचा ज्येष्ठ राजपुत्र दुर्योधन याच्या दृष्टिकोनातून दाखवण्यात आली आहे. राजमहालातील भव्य दृश्ये, द्यूतसभा, द्रौपदी वस्त्रहरण आणि कुरुक्षेत्रावरील 18 दिवसांचे महायुद्ध अशा अनेक महत्त्वाच्या प्रसंगांचा यात समावेश आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.
4. श्री राम राज्य (2011)
दिग्दर्शक: बापू
कलाकार: नंदमुरी बालकृष्ण, नयनतारा, अक्किनेनी नागेश्वर राव
OTT प्लॅटफॉर्म: अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
IMDb रेटिंग: 6.6/10
रामायणातील उत्तरकांडावर आधारित 'श्री राम राज्य' हा भावनिक आणि सुंदर पौराणिक चित्रपट आहे. तेलुगू भाषेतील या चित्रपटाचे हिंदी डब व्हर्जनही प्रेक्षकांना पाहता येते. या चित्रपटात वनवासानंतर माता सीता महर्षी वाल्मीकी यांच्या आश्रमात आश्रय घेतात. याच ठिकाणी लव आणि कुश यांचा जन्म होतो. पुढे मोठे झाल्यानंतर लव-कुश अयोध्येत रामायणाचे गायन करतात आणि त्यातून कथेला भावनिक वळण मिळते. रामायणातील या हृदयस्पर्शी प्रसंगांचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहण्यासारखा आहे.
5. कन्नप्पा (2025)
दिग्दर्शक: मुकेश कुमार सिंह
कलाकार: विष्णू मांचू, प्रभास, अक्षय कुमार, मोहनलाल, काजल अग्रवाल
OTT प्लॅटफॉर्म: अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
IMDb रेटिंग: 4.6/10
पौराणिक चित्रपटांच्या यादीत 'कन्नप्पा' या चित्रपटाचाही समावेश आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात. या चित्रपटाची कथा तिन्नाडू नावाच्या एका निर्भय आदिवासी योद्ध्याभोवती फिरते. सुरुवातीला नास्तिक असलेला तिन्नाडू पुढे भगवान शंकरांचा परमभक्त बनतो. आपल्या श्रद्धेपोटी तो स्वतःचे डोळेही अर्पण करण्यास तयार होतो. भगवान शिवांचे महान भक्त कन्नप्पा यांच्या जीवनकथेवर आधारित हा चित्रपट भक्ती, त्याग आणि श्रद्धेची ताकद दाखवतो.





