Friday, November 13, 2026

Cyclone Alert : राज्यासह देशात पुन्हा चक्रीवादळाचे संकट! अनेक राज्यांना अलर्ट

पश्चिम बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.अलीकडेच गुलाबी थंडीला राज्यात सुरुवात झाली आहे. असं असलं तरी पश्चिम बंगालच्या खाडीत चक्रीवादळं निर्माण झाले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं पहिल्यांदाच घडलं आहे की एकाच महिन्यात एकापाठोपाठ एक तीन चक्रीवादळं पश्चिम बंगालच्या खाडीत तयार झाले आहेत.

Cyclone Alert : पश्चिम बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.अलीकडेच गुलाबी थंडीला राज्यात सुरुवात झाली आहे. असं असलं तरी पश्चिम बंगालच्या खाडीत चक्रीवादळं निर्माण झाले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं पहिल्यांदाच घडलं आहे की एकाच महिन्यात एकापाठोपाठ एक तीन चक्रीवादळं पश्चिम बंगालच्या खाडीत तयार झाले आहेत. पहिलं अर्णब त्यानंतर मुरासु आणि आता पुन्हा एकदा नव्याने चक्रीवादळ येणार आहे. 13 ते 19 नोव्हेंबर दरम्यान आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, अंदमान-निकोबार आणि उत्तर-पश्चिम यांसह भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नॉर्थ आंध्र प्रदेशमध्ये आकवन चक्रीवादळ धडकणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा 16 नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या चक्रीवादळामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडणार असून अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा सारख्या राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे.

कोणकोणत्या राज्यांत पाऊस पडणार?

दक्षिण भारतात केरळ येथे 13 ते 15 नोव्हेंबर रोजी पाऊस पडणार आहे. त्यानंतर 16 ते 19 नोव्हेंबरच्या दरम्यान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काईकल येथे पाऊस पडणार आहे. 13-19 नोव्हेंबर दरम्यान लक्षद्वीप, 14-19 नोव्हेंबरच्या दरम्यान आंध्र प्रदेशची किनारपट्टी, यनम, रायलसीमामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी तमिळनाडु, पुद्दुचेरी, कराईकल, 16-19 नोव्हेंबरच्या दरम्यान केरळमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 18-19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशाची किनारपट्टी आणि यनममध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. पूर्व भारतालाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपमध्ये 13 ते 19 नोव्हेंबर दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. 18-19 नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगाल, ओडिशात पाऊस होणार आहे. तर 13-17 नोव्हेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेट समूहामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. विजांचा कडकडात होणार असून या भागात वेगाने वारे वाहणार आहेत. याशिवाय 18-19 नोव्हेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेट, 19 नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगालमध्ये प्रचंड वारे वाहणार आहेत. 13-16 दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटावर प्रचंड पाऊस होणार आहे. 18-19 नोव्हेंबर रोजी ओडिशामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. 13 ते 15 नोव्हेंबर यादरम्यान हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबमध्ये देखील मुसळधार पडणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >