Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. ...
या चक्रीवादळामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडणार असून अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा सारख्या राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे.
कोणकोणत्या राज्यांत पाऊस पडणार?
दक्षिण भारतात केरळ येथे 13 ते 15 नोव्हेंबर रोजी पाऊस पडणार आहे. त्यानंतर 16 ते 19 नोव्हेंबरच्या दरम्यान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काईकल येथे पाऊस पडणार आहे. 13-19 नोव्हेंबर दरम्यान लक्षद्वीप, 14-19 नोव्हेंबरच्या दरम्यान आंध्र प्रदेशची किनारपट्टी, यनम, रायलसीमामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी तमिळनाडु, पुद्दुचेरी, कराईकल, 16-19 नोव्हेंबरच्या दरम्यान केरळमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 18-19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशाची किनारपट्टी आणि यनममध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. पूर्व भारतालाही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अंदमान आणि निकोबार द्वीपमध्ये 13 ते 19 नोव्हेंबर दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. 18-19 नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगाल, ओडिशात पाऊस होणार आहे. तर 13-17 नोव्हेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेट समूहामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. विजांचा कडकडात होणार असून या भागात वेगाने वारे वाहणार आहेत. याशिवाय 18-19 नोव्हेंबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेट, 19 नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगालमध्ये प्रचंड वारे वाहणार आहेत. 13-16 दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटावर प्रचंड पाऊस होणार आहे. 18-19 नोव्हेंबर रोजी ओडिशामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. 13 ते 15 नोव्हेंबर यादरम्यान हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबमध्ये देखील मुसळधार पडणार आहे.