Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण ! मुंबई-पुण्यात 24 कॅरेट सोनं स्वस्त, चांदीचे भावही घसरले, पाहा आजचे दर

Gold Silver Price Today : सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सुरू असलेली घसरण 13 नोव्हेंबर रोजीही कायम आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यावसायिक दिवशी दिल्ली, मुंबई, पुणे यांसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर खाली आले आहेत. सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात दागिने खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता सराफा बाजारातील दरांकडे लागले आहे.



दिल्ली ते मुंबई, सोन्याचे दर किती झाले ?


13 नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 39 हजार 940 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 10 ग्रॅममागे 1 लाख 28 हजार 340 रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे, मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1 लाख 39 हजार 790 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 28 हजार 140 रुपये आहे. दिल्लीतील सराफा बाजारात यापूर्वी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम तब्बल 2,200 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली होती. बाजारातील मागणी कमी होणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरण यामुळे देशांतर्गत सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.



मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील सोन्याचे दर


13 नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. (दर प्रति 10 ग्रॅम)


दिल्ली - ₹1,39,940 - ₹1,28,340


मुंबई - ₹1,39,790 - ₹1,28,140


पुणे - ₹1,39,790 - ₹1,28,140


कोलकाता - ₹1,39,79- ₹1,28,140


चेन्नई - ₹1,39,790 - ₹1,28,140


बंगळुरू -  ₹1,39,790 - ₹1,28,140


स्रोत : मनीकंट्रोल



आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमती घसरल्या


भारतीय बाजारपेठेप्रमाणेच जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट भाव प्रति औंस 3,880.93 डॉलरवर पोहोचला आहे. जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतींमध्ये होणारे बदल, मागणी आणि आर्थिक घडामोडींचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही होत असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा परिणाम देशांतर्गत सोन्याच्या दरांवर दिसून येत आहे.



चांदीचे दरही घसरले; किलोचा भाव किती?


सोन्याच्या दरातील घसरणीबरोबरच चांदीच्या किमतीतही मोठी घट झाली आहे. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी चांदीचा भाव प्रति किलो 1 लाख 99 हजार 900 रुपये नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात चांदीने प्रति किलो 4 लाख रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस 50.12 डॉलरवर आहे. त्यामुळे सध्या सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये नरमाई दिसून येत आहे.



सोने खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा


सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत असल्याने ग्राहकांना खरेदीसाठी काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, दागिने खरेदी करताना केवळ सोन्याचा बाजारभाव पाहून निर्णय घेऊ नका. दागिन्यांची घडणावळ, जीएसटी आणि इतर शुल्क यांचाही अंतिम किमतीवर परिणाम होतो. तसेच शहरानुसार आणि सराफानुसार दरांमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील सराफा बाजारात आजचा दर तपासणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

Bomb Threat : खळबळजनक! मुंबईतील 6 बँकांना बॉम्बने उडवण्याची धमकी; 6 ठिकाणी एकाच वेळी ई-मेल

मुंबई : मुंबई महापालिकेला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर आता शहरातील विविध बँकांनाही लक्ष्य करण्यात आले

Baghpat : दिवाळीच्या रात्री राष्ट्रपती भवनातील सुरक्षारक्षकावर गोळीबार; दोन्ही आरोपी अटकेत, मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बागपत येथे राष्ट्रपती भवनात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकावर गोळीबार

Microsoft server down news : मायक्रोसॉफ्टची जागतिक यंत्रणा कोलमडली; आउटलुक, टीम्स आणि कोपायलट ठप्प झाल्याने भारतासह ७४ देशांना फटका

मुंबई : मायक्रोसॉफ्ट ३६५ (Microsoft 365) च्या यंत्रणेत अचानक मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जगभरातील लाखो युजर्सना नाहक

Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न; तिघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा

Nashik : पहाटे हुडहुडी, दुपारी उन्हाचा चटका ! नाशिकच्या हवामानात मोठा बदल

नाशिक : नाशिक जिल्ह्यात हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला असून, पहाटेच्या वेळी नागरिकांना चांगलाच गारठा जाणवू लागला

Maharashtra : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! 2.96 लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; 1.88 कोटी रुपये परत

मुंबई : राज्यातील दुष्काळाचा फटका शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांनाही बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने