IND vs NZ 4th ODI: भारताने 244 धावांनी सामना गमावला आणि नकोसे विक्रम केले नावावर, वाचा काय ते

न्यूझीलंडने चौथ्या वनडे सामन्यात भारताला 244 धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळे भारताच्या नावावर नकोसे विक्रम रचले गेले आहे. भारताचा हा वनडे क्रिकेट इतिहासातील दुसरा मोठा पराभव आहे.

1/5 न्यूझीलंडचा एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 244 धावांनी मिळवलेला विजय हा त्यांच्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. 2008 मध्ये आयर्लंडविरुद्ध ॲबरडीन येथे मिळवलेला 290 धावांनी विजय मिळवला होता. (Photo: BCCI Twitter)

2/5 भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. माउंट माउंगानुई येथील 244 धावांचा पराभव हा भारतीय क्रिकेट इतिहासातील धावांच्या फरकाने झालेला दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. भारताचा सर्वात मोठा पराभव 2000 मध्ये शारजाह येथे श्रीलंकेविरुद्ध 245 धावांनी झाला होता. हा नकोसा विक्रम अवघ्या 1 धावेने वाचला. (Photo: BCCI Twitter)

3/5 न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय संघ अवघ्या 89 धावांवर सर्वबाद झाला. ही भारताची एकदिवसीय क्रिकेटमधील सहावी सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली आहे. भारताचा संघ संपूर्ण वनडे इतिहासात आतापर्यंत आठ वेळा 100 धावांच्या आत बाद झाला आहे. या यादीत 2000 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शारजाह येथे केलेली 54 धावांची नीचांकी धावसंख्या आहे. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियाविरुद्ध 63 (1981), श्रीलंकेविरुद्ध 78 (1986), पाकिस्तानविरुद्ध 79 (1978) आणि न्यूझीलंडविरुद्ध 88 (2010) या धावसंख्यांचा समावेश आहे. (Photo: BCCI Twitter)

4/5 भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडणाऱ्या मॅट हेन्रीने या सामन्यात 6 बळी घेतले आणि न्यूझीलंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्यांदा आपले नाव कोरले. या कामगिरीसह त्याने दिग्गज वेगवान गोलंदाज शेन बाँडच्या 4 वेळा 5 बळी घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. न्यूझीलंडकडून सर्वाधिक 6 वेळा पाच बळी घेण्याचा विक्रम ट्रेंट बोल्टच्या नावावर आहे. (Photo: NZ Cricket Twitter)

5/5 भारताविरुद्ध पुन्हा एकदा पाचपेक्षा जास्त बळी घेत मॅट हेन्रीने एका खास यादीत स्थान मिळवले आहे. एकाच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा तो न्यूझीलंडचा चौथा गोलंदाज ठरला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वेळा पाच बळी घेणारा शेन बाँड अव्वल स्थानावर आहे. (Photo: NZ Cricket Twitter)
Comments
Add Comment

IND vs NZ 4th ODI: भारताचा मानहानीकारक पराभव, नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला...

न्यूझीलंडने चौथ्या वनडे सामन्यात कमबॅक केलं आणि भारताला 244 धावांनी पराभूत केलं. खरं तर न्यूझीलंडसाठी हा सामना

IND vs NZ 4th ODI: चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडची सरशी, भारताला 244 धावांनी केलं पराभूत

न्यूझीलंडने चौथ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचं पाणी पाजलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकूनही भारताला

IND vs NZ 4th ODI: रोहित शर्मा आणि इशान किशनची चूक भारतीय संघाच्या अंगलट आली, 120 धावांचा फटका बसला Video

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा वनडे सामना माऊंट माऊगानुई येथे सुरू आहे. या सामन्यात भारताच्या बाजूने

W,W,W..! पहिल्या षटकात भारताच्या शून्य धावा आणि तीन विकेट, असं पहिल्यांदाच घडलं आणि रोहित-विराटसोबत दुसऱ्यांदा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथा वनेड सामना बे ओव्हलच्या माऊंट माऊंगनाई येथे होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा

Dakar Youth olympics 2026 : भारताचा ऐतिहासिक सुवर्णप्रवास; 9 पदकांसह पदकतालिकेत दिमाखदार कामगिरी

डकार (सेनेगल) : डकार येथे सुरू असलेल्या चौथ्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय युवा खेळाडूंनी दमदार

आयपीएल 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत अक्षर पटेल; फ्रँचायझीमध्ये खळबळ!

नवी दिल्ली : आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2027 च्या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून मोठी बातमी समोर येत