Microsoft 365 ची सेवा पुन्हा रुळावर! Outlook सेवा पूर्ववत; जगभरातील युजर्सना मोठा दिलासा!

गेल्या 18 तासांपासून जगभरात विस्कळीत झालेली मायक्रोसॉफ्टची सेवा अखेर पूर्वपदावर येत आहे, मायक्रोसॉफ्ट आऊटलूकची सेवा पुन्हा पुर्वपदावर येत आहे. या महा- आऊटेजमुळे अनेक देशांतील सरकारी आणि खाजगी कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले होते. मायक्रोसॉफ्टने या बिघाडाचं नेमकं कारण, अद्यापही स्पष्ट केलेलं नाही, मात्र सेवा सुरळीत करण्याचे काम अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे.

मुंबई: नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या 18 तासांपासून बंद असलेलं मायक्रोसॉफ्ट आऊटलूक (Microsoft Outlook)ची सेवा पुर्वपदावर येत आहे. 18 तास चाललेल्या महा-आऊटेज (Outage) नंतर मायक्रोसॉफ्टची (Microsoft) यंत्रणा आणि सेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. लोकप्रिय ई-मेल सेवा 'आऊटलूक' (Outlook) आता युजर्ससाठी पुन्हा सुरू झाली असून, रखडलेल्या ई- मेलच्या बॅकलॉग प्रक्रियेवर वेगाने काम केले जात आहे.



शुक्रवारी रात्री 11 वाजता जाहीर केलेल्या स्टेटस अपडेटमध्ये, मायक्रोसॉफ्टची क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरने दिलेल्या माहितीनुसार, "आम्हाला सेवेच्या पुनर्प्राप्तीमध्ये अत्यंत सकारात्मक प्रगती दिसत असून, प्रभावित मायक्रोसॉफ्ट 365 पायाभूत सुविधांच्या मोठ्या भागात सेवा उपलब्धता आणि ई- मेल वितरण कामगिरी सुधारत आहे." शुक्रवारी दिवसभर आऊटलूक पूर्णपणे बंद होते, परंतु रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एशिया- पॅसिफिक क्षेत्रातील काही देशांमध्ये सेवा पूर्ववत करण्यात कंपनीला यश आले.



या भीषण आऊटेजमुळे जगभरातील अनेक विविध संस्था आणि कार्यालयांचा शुक्रवारचा संपूर्ण दिवस विनाकारण वाया गेला. अनेक इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या आणि सरकारी विभागांनी मायक्रोसॉफ्ट सेवा बंद असल्यामुळे ग्राहकांना कोणतीही मदत करू शकणार नाही, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली होती. दिवसभरात पाठवलेले नियोजित ई- मेल अनेक तास उशिरा आणि विस्कळीत स्वरूपात पोहोचल्याचे काही युजर्सचे म्हणणे आहे.



Backend मध्ये असलेल्या तांत्रिक कारणामुळे असलेले ग्लिचेस वेगाने साफ करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विलंबाने येणाऱ्या संदेशांचे रक्षण करण्यासाठी आणि वितरण सुरळीत करण्यासाठी कंपनीने त्यांच्या ई-मेल टाइमआऊट विंडोमध्ये बदल करून ती 48 तासांपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेमागे कोणतीही दुर्भावनापूर्ण किंवा हॅकिंगची कृती असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही, असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे. सर्व सेवा पूर्णपणे सुरळीत झाल्यानंतर या तांत्रिक बिघाडाचे मूळ कारण (Root Cause) आणि बचावात्मक उपायांचा सविस्तर अहवाल जाहीर केला जाईल, असे कंपनीने सांगितले आहे.

Comments
Add Comment

थिएटरमध्ये तुफान कमाई केल्यानंतर 'हनुमान अंश' OTT वर रिलीज होणार, कुठे होणार रिलीज; जाणून घ्या तारीख

मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित, 'हनुमान अंश' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले. 2

Mumbai Fire: परळच्या कामगार स्टेडियममध्ये भीषण आग, लाकूड आणि बांबूच्या साहित्याला आग; जीवितहानी नाही

मुंबई: मुंबईतील दादर पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील प्रसिद्ध कामगार स्टेडियममध्ये रविवारी

ठाण्यात खळबळ! मासुंदा तलावात 32 वर्षीय महिलेची उडी; पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क!

ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर

महाराष्ट्रात 1440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती; ग्रामीण आरोग्य सेवेला मिळणार बळकटी

मुंबई: महाराष्ट्र सरकारने जनतेला उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचे आश्वासन

मुंबई: राज्यात फळबागा असलेल्या एकूण 6 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रापैकी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सुमारे 2.5 लाख

मुंबई- बेंगळुरू प्रवास आता सुस्साट, 988 Km चं अंतर फक्त 16 तासांत पूर्ण करता येणार

मुंबई: केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री- एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय ग्राहक व्यवहार- प्रल्हाद जोशी, अन्न