PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्नाटक दौरा; 15,600 कोटींच्या विकासकामांची भेट, म्हैसूरमध्ये तारांगणाचे उद्घाटन

त्यानंतर दुपारी सुमारे 12:45 वाजता तावरेकेरे ते आयआयएम बंगळूरु मेट्रो स्थानकादरम्यान धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

कर्नाटक : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कर्नाटक दौऱ्यावर असून, त्यांचे बंगळूरु येथे आगमन झाले. यावेळी कर्नाटकच्या राज्यपाल सुधा यादव आणि मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी त्यांचे स्वागत केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळूरु येथे ‘प्रशांती कुटीरम’च्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होणार असून, यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर दुपारी सुमारे 12:45 वाजता तावरेकेरे ते आयआयएम बंगळूरु मेट्रो स्थानकादरम्यान धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यानंतर ते मेट्रोने प्रवासही करणार आहेत.




15,600 कोटींच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन


दुपारी सुमारे 1:15 वाजता पंतप्रधान 15,600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहेत.


या प्रकल्पांमध्ये शहरी वाहतूक, वीज पारेषण, नवीकरणीय ऊर्जा, पेट्रोलियम पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि रेल्वे या क्षेत्रांचा समावेश आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील.






म्हैसूरमध्ये देशातील पहिले एलईडी डोम तारांगण


बंगळूरुमधील कार्यक्रमांनंतर पंतप्रधान मोदी म्हैसूरला जाणार आहेत. दुपारी सुमारे 3:30 वाजता ते कॉसमॉस-म्हैसूर तारांगणाचे उद्घाटन करतील. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सने विकसित केलेले हे देशातील पहिले एलईडी डोम तारांगण असल्याचे सांगण्यात आले आहे.


म्हैसूर विद्यापीठाच्या परिसरात, चामुंडी टेकड्यांच्या पायथ्याशी हे तारांगण उभारण्यात आले आहे. येथे खगोलशास्त्राशी संबंधित विविध कार्यक्रम आणि म्हैसूरचा इतिहास व खगोलशास्त्रावर आधारित चित्रपट दाखवले जाणार आहेत. हे कार्यक्रम कन्नड, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध असतील.


या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून कर्नाटकातील पायाभूत सुविधा आणि विज्ञान शिक्षणाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.



बंगळुरू मेट्रोचे शतक!


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘नम्मा मेट्रो’च्या पिंक लाईनवरील पहिल्या उन्नत (Elevated) मार्गाचे उद्घाटन होत आहे. या नव्या मार्गिकेमुळे बंगळुरू मेट्रो नेटवर्कने पहिल्यांदाच 100 किलोमीटरचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला आहे.


कलेना अग्रहारा ते तवरेकेरे यादरम्यानच्या या 6.5 किलोमीटरच्या मार्गात एकूण सहा स्थानके येतात—कलेना अग्रहारा, हुलीमावू, आयआयएमबी (बिलेकाहल्ली-आयआयएमबी), जेपी नगर चौथा टप्पा, जयदेव रुग्णालय आणि तवरेकेरे. प्रवासी वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करण्यापूर्वीची अंतिम सुरक्षा तपासणी (CMRS) 8 ऑक्टोबर 2026 रोजी पूर्ण झाली होती, तर 28 ऑक्टोबर रोजी याचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले. दरम्यान, या प्रकल्पाचा उर्वरित भूमिगत (Underground) टप्पा 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Comments
Add Comment

PM Modi Bangalore visit : देशाला शिस्तप्रिय आणि सक्षम नागरिक देण्याचे काम एच. व्ही. शेषाद्री यांनी केले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

बेंगळुरू : ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक एच. व्ही. शेषाद्री (H. V. Sheshadri) यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या उभारणीसाठी

Odisha Accident : पुरीच्या दर्शनासाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात; अनेक प्रवासी जखमी

Accident News: पश्चिम बंगालहून ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या बसला

ASEAN Summit : पंतप्रधान मोदी 16 नोव्हेंबरपासून फिलीपिन्स दौऱ्यावर; आसियान आणि पूर्व आशिया शिखर परिषदेत होणार सहभागी

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 नोव्हेंबरपासून फिलीपिन्सची राजधानी मनिला येथे तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार

Gold Rate : सोनं खरेदीची संधी की आणखी दरवाढीची प्रतीक्षा? डिसेंबरमध्ये मोठा उलटफेर शक्य!

Gold Rate : दिवाळी नंतरच्या लगेच दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा

रीलच्या नादात चालती बस सोडून खाली उतरला ड्रायव्हर; प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा VIDEO व्हायरल!

Bus Driver Reel : सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या आणि लाइक्स-व्ह्यूजच्या नादात लोक आता स्वतःचाच नव्हे तर

Piyush Goyal Kattappa remark : ‘कट्टप्पांसारख्या जगात भारतच तुमचा विश्वासू सोबती’; पियुष गोयल यांचे जागतिक गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीचे मोठे आवाहन

विशाखापट्टनम : सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायामध्ये 'विश्वास' ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट बनली आहे.