मुंबई: सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ‘चित्रपताका’ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे (Chitrapataka 2026) दिमाखदार उद्घाटन नुकतेच पार पडले आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात 15 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत हा चार दिवसीय भव्य महोत्सव रंगणार आहे. यंदाचे हे महोत्सवाचे दुसरे पर्व असून, चित्रपट रसिकांसाठी हा एक सुवर्णकाळ ठरत आहे.
Daryabhavani Movie: कोकणातील ऐतिहासिक पूर्णगड किल्ल्यावर ‘दर्याभवानी’चे शूटिंग; शिवरायांच्या आरमाराची शौर्यगाथा उलगडणार!
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे पराक्रम आणि ...
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात रंगणाऱ्या या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे- पाटील यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाची सुरुवात नितीन सुपेकर दिग्दर्शित आणि उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बंधू’ या अद्याप अप्रदर्शित असलेल्या चित्रपटाने झाली. दोन भावांमधील नातेसंबंध, प्रेम, संघर्ष आणि त्याग यावर आधारित या भावस्पर्शी सिनेमाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
33 सिनेमे आणि खास संवाद सत्रे
या चार दिवसांच्या महोत्सवात प्रेक्षकांना तब्बल 33 आशयघन सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी अनुभवता येणार आहे. यामध्ये 7 परिसंवाद, 4 विशेष मुलाखती आणि कार्यशाळांचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सचिन पिळगांवकर, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या विशेष मुलाखती या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. चित्रपट निर्मितीतील नवे तंत्रज्ञान, लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि वितरण यांसारख्या विविध विषयांवर येथे सखोल चर्चा होत आहे.
Barpeta artisans Ramayana armor : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाशी आसामचे खास कनेक्शन; बार्पेेटाच्या कुशल कारागिरांनी साकारले अभिनेत्यासाठी खास चिलखत!
दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेला रणबीर कपूर स्टारर बहुचर्चित 'रामायण' (Ramayan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर ...
दुर्मीळ उपक्रम: दुष्काळग्रस्तांना मदत
या महोत्सवाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे, प्रेक्षकांकडून आकारण्यात येणारे चार दिवसांचे अवघे 100 रुपये नोंदणी शुल्क संपूर्णपणे दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या सूचनेनुसार हा संवेदनशील निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रसिकांना केवळ दर्जेदार मनोरटनाचाच आनंद मिळत नाही, तर दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे सामाजिक कर्तव्यही पार पाडता येत आहे.
महोत्सवाच्या या आयोजनाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून, मराठी चित्रपटांच्या कलात्मक, सांस्कृतिक आणि सामाजिक आशयाचे दर्शन घडवणारा हा महोत्सव चित्रपटप्रेमी, विद्यार्थी आणि नवोदित कलाकारांसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरत आहे. महोत्सवाविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.