IND vs NZ 5th ODI Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा वनडे सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना होत आहे. हा सामना निर्णायक असून मालिका विजयाचं गणित सोडवणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. चला जाणून घेऊयात हा सामना कधी आणि कुठे पाहायचा ते..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. चार सामन्यानंतर मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. भारताने सुरूवातीचे सलग दोन सामन्यात विजय मिळवून आघाडी घेतली आहे. तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आणि न्यूझीलंडचं मालिका विजयाचं गणित फिस्कटलं. चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने जोरदार कमबॅक केलं आणि 244 धावांनी पराभूत केलं. आता भारताला मालिका विजयासाठी आणि न्यूझीलंडला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी शेवटचा सामना जिंकणं भाग आहे. त्यामुळे पाचवा सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. चौथ्या वनडे सामन्यात मॅट हेनरी भारताचा दाणादाण उडवून दिली होती. त्याने एकट्याने टीम इंडियाच्या सहा विकेट काढल्या होत्या. पण शेवटच्या वनडे सामन्यात खेळणार नसल्याने टीम इंडियाला दिलासा असणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी मॅट हेनरी वेलिंग्टनला रवाना झाला आहे. दुसरीकडे, गुरनूर ब्रार शेवटच्या वनडे सामन्यात नसेल. कसोटी मालिकेसाठी त्याची निवड कुलदीप यादवच्या जागी केली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा वनडे सामना केव्हा आणि कुठे होणार?


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवा वनडे सामना रविवार, 15 नोव्हेंबर रोजी माउंट माउंगानुई येथील बे ओव्हलवर खेळला जाईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा वनडे सामना किती वाजता सुरू होईल?


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा एकदिवसीय सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेकीचा कौल हा अर्धा तास आधी म्हणजेच 7 वाजता होईल.





भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा वनडे सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित केला जाईल?


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा एकदिवसीय सामना भारतात रविवार, 15 नोव्हेंबर रोजी सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 टीव्ही चॅनलवर थेट प्रक्षेपित केला जाईल.

भारतात भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचवा वनडे सामना ऑनलाइन कसा पाहावा?


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा एकदिवसीय सामना सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपित केला जाईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या वनडे सामन्यासाठी संघ


भारत: रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), अक्षर पटेल, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, औकिब नबी, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, तिलक वर्मा, कुलदीप यादव, कुमार कुशाग्रा, यश ठाकूर.

न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​टिम सेफर्ट (विकेटकीपर), निक केली, डीन फॉक्सक्रॉफ्ट, फिन ॲलन, मायकल ब्रेसवेल, क्रिस्टियन क्लार्क, मॅथ्यू फिशर, जेकब डफी, ब्लेअर टिकनर, मिचेल हे, ब्रेट रँडेल, जोश क्लार्कसन.
Comments
Add Comment

IND vs NZ Test Series: पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियात मोठा बदल, कुलदीप यादव बाहेर आणि...

न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात

6,6,6,6,6,4,4,4,4,4,4..! सूर्यकुमार यादवने फक्त 15 चेंडूत ठोकलं अर्धशतक, मुंबईचा सहज विजय

[caption id="attachment_1075114" align="aligncenter" width="800"] सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपद मिळवलं. पण सूर्यकुमारचा फॉर्म

बीसीसीआयच्या अंडर-19 महिला क्रिकेट टीममध्ये निवड झालेल्या खेळाडूची राहत्या घरी आत्महत्या; क्रीडाविश्वात एकच खळबळ!

सध्या देशभरात महिला क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढT असताना आणि युवा खेळाडू आपल्या उज्ज्वल भविष्याचे

IND vs PAK U19 Asia Cup Final Live Score: आर्यवीर सेहवाग आणि लक्ष्य रायचंदानी यांची जोडी जमली

एसीसी पुरुष 19 वर्षांखालील आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. ओमानमधील

India vs Pakistan U19 Asia Cup Final 2026: भारत पाकिस्तान महामुकाबला, कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

एसीसी अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हायव्होल्टेज सामना पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.

Ahilyanagar Kho-Kho Championship: ४० वर्षांनंतर नगरमध्ये रंगणार राज्य खो-खो स्पर्धेचा थरार; २८ नोव्हेंबरपासून ४८ संघांमध्ये चुरस!

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : तब्बल चार दशकांनंतर अहिल्यानगर शहराला पुन्हा एकदा पुरुष व महिला गटातील राज्यस्तरीय