सध्या देशभरात महिला क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढT असताना आणि युवा खेळाडू आपल्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहत असताना, क्रीडाविश्वाला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अंडर-19 महिला क्रिकेट टीममध्ये निवड झालेल्या एका होतकरू आणि प्रतिभावान महिला खेळाडूने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत जगाचा निरोप घेतला आहे. नंदिनी असे या दुर्दैवी खेळाडूचे नाव असून, तिच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर आणि संपूर्ण क्रीडा विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमीक माहितीनुसार, मृत नंदिनीने आपल्याच घरातील सिलिंग फॅनच्या हुकाला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही युवकांच्या सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून या तरुण खेळाडूने आपले आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कायदेशीर व पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून शुक्रवारी सकाळी मृतदेह पोस्टमार्टम नंतर शोकाकुल कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.
विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या नकोशा विक्रमाची केली बरोबरी, न्यूझीलंडविरुद्धच्या चार सामन्यात नको ते घडलं
[caption id="attachment_1074904" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. मैदानात हजेरी लावली आणि तंबूत परतले. ...
या अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनेनंतर मृत नंदिनीच्या कुटुंबियांनी आणि संतप्त नातेवाईकांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने केली. अनिल आणि कृष्णा नावाच्या दोन युवकांच्या सततच्या मानसिक त्रासाला व ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच आपल्या मुलीने हे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. तसेच, या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबियांनी लावून धरली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करण्यासाठी विकाराबादचे सर्कल इन्स्पेक्टर रघु यांनी मृत नंदिनीचा मोबाईल जप्त केला असून, तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून तिला नेमका कोणी व कशा प्रकारे त्रास दिला होता, हे शोधून काढण्यासाठी तिचे इंस्टाग्राम अकाउंट आणि चॅट्स कसून तपासले जात आहेत. एका होतकरू व प्रतिभावान खेळाडूचा अशा प्रकारे अचानक अंत होणे क्रीडा जगतासाठी कधीही न भरून निघणारे नुकसान मानले जात आहे. पोलीस तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारावर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.